नरेंद्र दाभोलकर यांना कलावंतांकडून श्रद्धांजली
अनिल उट्टलवार यांच्या शिवराज रंगभूमी निर्मित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन आसावरीने केले आहे. एवढेच नाही, तर ती मुख्य भूमिकाही साकारणार आहे. आसावरीने लिहिलेले हे झाडीपट्टी रंगभूमीवरील पाचवे नाटक असेल. विशेष म्हणजे अंधश्रद्धा, भोंदूगिरी, नरबळी आदींना आळा घालण्यासाठी शासनाने विधेयक मंजूर केले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमी आणि चित्रपटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याला आसावरीच्या नाटकाने आणखी बळ मिळणार यात दुमत नाही. यासह "लग्नाआधी विघ्न' आणि "बायको नखऱ्याची' या दोन नाटकांचीही निर्मिती शिवराजने केली आहे. यापैकी "लग्नाआधी विघ्न'चे लेखन-दिग्दर्शनही आसावरीनेच केले आहे. तिन्ही नाटकांमध्ये तिच्या प्रमुख भूमिका असतील, हे विशेष. शार्दूल-संतोष-संदीप यांनी संगीत दिले आहे. तर, तिन्ही नाटकांमध्ये आसावरीसह प्रतिभा साखरे, पिंकी कांबळे, श्रद्धा, राहुल ठाकरे, चेतन राणे, चेतन वडगाये, राज पटले, डॉ. राज मराठे, श्री. उईके, अधीर कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील.