सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड
पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत गैरवर्तुणूक
शांतता समितीच्या महिला सदस्यासही हाकलुन लावले
पोलिस ठाण्यात तक्रार देऊन निलंबित करण्याची मागणी
चंद्रपूर - दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती अमोल मालेकर (वय ३२) यांचे भद्रावतीजवळ अपघातात निधन झाले. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाने अरेरावी करीत गैरवर्तुणूक केली. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांच्याशी हुज्जत घालून सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने हाकलुन लावले. शिस्टमंडळाने आपला परिचय दिल्यानंतरही म्हणणे एकूण घेण्यासाठी हे महाशय तयार नव्हते. दरम्यान, या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार देऊन निलंबित करण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीने भद्रावती येथून चंद्रपूरकडे येत असताना मागून आलेल्या मेटाडोर क्र. एमपी -०१ वाय ६६१७ ने जोरदार धडक दिली. यात अमोल मालेकर (वय ३२) च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी चालकाने गुन्हा मान्य करीत पोलिसांच्या स्वाधीन झाला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृत हा दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती असल्याने घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांचे शिस्टमं डळ गेले होते. यावेळी त्यांनी घटना कशी घडली, कुठे घडली, मेटाडोर चालक, मालक , वाहन क्र. आदी माहितीची विचारणा करायची होती. मात्र, ठाण्यात सेवेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड याने सर्वाना हाकलुन लावले. यावेळी शांतता समिती तथा महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे या देखील उपस्थित होत्या. त्यांनी आपला परिचय दिल्यानंतरहि यांच्याशी हुज्जत घालून बाहेर निघण्यास सांगिलते. या प्रकारामुळे पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत गैरवर्तुणूक, शांतता समितीच्या महिला सदस्याचा अवमान झाला आहे. या प्रकरणी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य माजी नगरसेविका रत्नमाला बावणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड यांच्या विरुद्ध त्याच पोलिस ठाण्यात तक्रार दिलि. सहायक पोलिस निरीक्षकाने प्रकरण दाबण्यासाठी वाहन मालकासोबत सेटिंग केली असावी. त्यामुळेच पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करून गैरवर्तुणूक केली, असा आरोप रत्नमाला बावणे यांनी केला असून निलंबित करण्याची मागणी केली आहे.