गडचिरोली- गडचिरोलीतील कुरखेड तालुक्यातल्या छोडाजुलिया गावामध्ये भूसुरुंग स्फोटामध्ये तीन पोलीस ठार झाले. नक्षलग्रस्त भागात पोलीस पथकाची गस्त सुरू असताना भूसुरुंग स्फोट झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील कोटासुर्य जंगलात आज (गुरूवारी) पहाटे नक्षलवादी हल्ल्यात तीन पोलिस हुतात्मा झाले. पोलिस दलात कमांडो असलेल्या तिघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कोटासुर्य जंगलातील नक्षल प्रभावित भागात कमांडोंची गाडी नक्षलवाद्यांनी भूसुरंगाने उडविली. त्यानंतर कमांडोंच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. कुरखेडा जंगल परिसरात विशेष कृती दलाचे जवान जीपने गस्त घालीत होती. मात्र, त्याआधीच नक्षलवाद्यांनी झरी गावातल्या जंगलात भूसुरुंग पेरून ठेवले होते. त्यात हे विशेष कृती दलाचे जवान शहीद झाले आहेत. ग्यारापट्टी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे.