সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 09, 2013

झाडीपट्टी रंगभूमीला आता नाट्यमहोत्सवाची जोड

प्रतिनिधी
चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर रंगणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीला आता नाट्यमहोत्सवाची जोड मिळणार आहे. केवळ झाडीपट्टीतील संस्था , कलाकार , लेखक, दिग्दर्शकांसाठी वर्षातून सात दिवस नाट्यमहोत्सव घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र शास्नाच्या विविध उपक्रम व योजनांतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात येईल , असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी नाट्य परिषद नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष शेखर बेंद्र यांच्या शिष्टमंडळाला दिले. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान हा सात दिवसांचा महोत्सव असावा , अशी सूचना शेखर बेंद्रे यांनी घोरपडे यांना केली होती. किमान चार ते पाच वर्ष झाडीपट्टीत प्रयोग करणाऱ्या संस्थांना यात सहभाग असावा , शासनातर्फे उत्कृष्ट प्रयोगांना व कलाकारांना पुरस्कार देण्यात यावे , प्रयोग सादरीकरणाचा खर्च संस्थाना देण्यात यावा ,तालुकास्तरावरील सर्वच केंद्रांवर नाटक सादर केले जावे , असा प्रस्ताव सांस्कृतिक संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात झाडीपट्टी कलाकारांशी संपर्क साधून चर्चा करण्यात येईल. २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्यात येईल व नोंव्हेंबरमध्ये त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल , असे आश्वासन आशुतोष घोरपडे यांनी दिले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.