बंडु सितारामजी धोतरे यांची मागणी
शहराबाहेरील रस्ते हे सार्वजनीक बांधकाम विभागाकडे आहेत या रस्त्याची सुध्दा अवस्था याच पध्दतीची आहे. या रोडवर सुध्दा धुळीचे प्रचंड प्रमाण असल्याने प्रदुषणाची तिव्रता अधिक आहे. या रोडवरील धुळ साफ करण्याकरिता संबधीत विभागाचा नियोजनपुर्वक कार्यक्रम असायला पाहीजे. तेव्हाच शहरातील धुळीची समस्या कायम स्वरूपी दुर होऊ शकते. याकरिता शहरातील प्रमुख रस्त्यासोबत खालील ठिकाणी उपाय योजना करणे गरजेचे आहे. शहरातिल रस्ते सफाई दरम्यान रस्त्याच्या दुर्तफा जमा होणारी धुळ, रेती उचलण्यात यावे. दर हप्तात एक/दोन दिवस कार्यक्रम ठरवून ‘ब्रशचा’ वापर करून रस्त्यावरील धुळ साफ करण्यात यावी. शहरातील व बाहेरील रस्त्यावरील रस्ता दुभाजकाच्या बाजुला जमा होणारी धुळ साफ करण्यात यावे. लखमापुर परिसरात जुने कोल डेपो मुळे जमा असलेली ‘कोल डस्ट’ साफ करणे. रस्त्याच्या बाजुला रिकाम्या जागेवर ‘सिंमेट ब्लाॅक’ लावण्याचे काम त्वरीत पुर्ण करणे. वरोरा नाका ‘उड्डाणपुल’ बांधकामामुळे शहिद स्मारकामागुन पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे, या रत्याचे त्वरीत डांबरीकरण करणे. बिनबा गेट ते रामनगर चैक पर्यतचा रस्ता त्वरीत डांबरीकरण करणे. रस्त्याचे खड्डे बुजविण्याकरिता मुरूमचा वापरावर बंदी करावी. शहरात कुठलीही केबल लाईन करिता नालीचे खोदकाम रात्रीच्या वेळेत करावे, तेवढेच काम करावे जेवढे त्या रात्रीत खोदल्यानंतर बुजविता येईल.