२७ आक्टोबर
आनंदवनातील अर्धगोलाकार छतांच्या भुकंपरोधक घरांचे प्रात्यक्षिक त्यांनी किल्लारीतील भूकंपग्रस्त भागात दाखवले. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंदाच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगारसंधी निर्माण करण्यात विकास आमटे यांची भूमिका महत्त्वाची होती. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यातील मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांनी विशेष सामाजिक कृती व पर्यावरण संवर्धन केंद सुरू केले. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण घटलेच, पण परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत आमूलाग्र बदल घडवले.
भूमीतील श्रमसिद्धांताचा परीघ यवतमाळ जिल्ह्यातील झरीझामणीपर्यंत नेऊन ठेवला. कुष्ठरुग्णांपासून सुरू झालेल्या चळवळीसाठी राबणारे हात आता आत्महत्याग्रस्त भागात दिलासा देण्यासाठी झटत आहेत.
आनंदवनाच्या वाढत्या गरजा ओळखून विकासभाऊंनी बदल केले. सांडपाण्याच्या निचरा यंत्रणेचा अभ्यास करून त्याधारे स्वच्छतागृहांची उभारणी, त्यावर बायोगॅस संयंत्रे उभारून ऊर्जानिमिर्ती, बेंगळुरूतील तज्ज्ञांच्या मदतीने निर्धूर चुलींची बांधणी, फुटलेल्या कपबश्यांचे तुकडे वापरून उभारलेले कठडे, श्रमदानातून तयार केलेले साठवण तलाव, टाकाऊ प्लास्टिक व टायरपासून उभारलेले बंधारे अशी विकास आमटेंचे व्यवस्थापन कौशल्य आणि कार्यकुशलत यांची उदाहरणे आज आनंदवनात ठिकठिकाणी पहायला मिळतात.
आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी त्यांनी रोजगाराची साधनेही उपलब्ध करून दिली. कोलकात्यातून माशांची पिले आणून सुरू केलेली मत्स्यशेती, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड आदी उपक्रम सुरू केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच आनंदवनातील कुटिरोद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची संख्या आज सव्वाशेवर पोहोचली आहे.
आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी त्यांनी रोजगाराची साधनेही उपलब्ध करून दिली. कोलकात्यातून माशांची पिले आणून सुरू केलेली मत्स्यशेती, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड आदी उपक्रम सुरू केले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच आनंदवनातील कुटिरोद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची संख्या आज सव्वाशेवर पोहोचली आहे.
(माहिती संकलन * देवनाथ गंडाटे ९९२२१२०५९९)
पुरस्कार
Shri Vikas Amte receiving honorary doctorate degree on behalf of his father Shri Baba Amte from the Prime Minister, Dr. Manmohan Singh at Tata Institute for Social Science (TISS), Mumbai on ay 6, 2006. |
२०१२ लोकमान्य टिळक पुरस्कार-
२०१३ क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार
सप्टें २००९ - ज्ञानेश्वर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिला जाणारा दिवंगत मारुतराव घुले पुरस्कार
जानेवारी २०१२ चंद्रपूर भूषण पुरस्कार
|
बालपण |
डा. भारती आमटे सोबत
आयबी एन लोकमत च्या दिवाळी विशेष कार्यक्रमात
झी २४ तास च्या दिवाळी विशेष कार्यक्रमात
कॅप्शन जोडा
आनंदवनातील एक क्षण