সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 16, 2013

मूलचे चार मजूर जीप अपघातात ठार




यवतमाळ  : सोयाबीन काढणीसाठी आलेले मजूर परतीच्या प्रवासावर असताना त्यांच्या क्रुझर वाहनावर काळाने घाला घातला. भरधाव क्रुझर झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर १९ जण जखमी झाले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील रुंझा बायपासवर रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळावर रक्तामांसाचा सडा पडला होता. गावकर्‍यांनी जखमींना मदत करून तत्काळ यवतमाळच्या रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले.
कोमदेव लक्ष्मण भोयर (३५), संजय पांडुरंग गावतुरे (३0), जंगलू लक्ष्मण भोयर (४0), राजू आत्माराम सातक (४५) सर्व रा.हळदी (ता.मूल, जि.चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. हळदी येथील ही मंडळी १५ ते २0 दिवसांपूर्वी सोयाबीन काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आली होती. नेर तालुक्यातील उमरठा येथे सोयाबीन काढणीचे काम आटोपून काल रात्री एम.एच.१२/बीपी-३४४१ या क्रुझरने हळदीकडे निघाले. क्रुझरमध्ये तब्बल २३ जण प्रवास करीत होते. रुंझा बायपासवर रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण गेल्याने क्रुझर झाडावर जावून आदळली. समोर बसलेले तीन जण जागीच ठार झाले तर राजू सातक याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले कोमदेव आणि जंगलू हे सख्खे भाऊ आहेत. या अपघातात संगीता शालिक भोयर (३0), शालिक सकरू भोयर (३२), बालाजी सकरू भोयर (४0), दर्शना संतोष भोयर (३५), मीराबाई जंगलू भोयर (४२), प्रमिला सकरू भोयर (१९), अरविंद मारोती शिंदे (२५) हे गंभीर जखमी झाले. तर सुशीला हरिदास भोयर (५0), सिंधु राजू सातक (४0), संतोष जगू भोयर (२३), हरिदास गणपत भोयर (४0), मायाबाई कोमदेव भोयर (३0), रंजिता श्रीराम शिंदे (४१), श्यामराव सुखदेव भोयर (२८), संतोष गेडाम (२५), दुर्गा संतोष गेडाम (२३), संतोष देवतळे (२१), शालू शंकर बोबडे (२५), उषा संजय गोटुरे (३२) हे जखमी झाले. अपघाताची माहिती रुंझा गावात एका दुचाकीस्वाराने येऊन दिली. तेव्हा इमरान पठाण, अशोक सहारे, विनोद दारव्हणकर, चंदन तोडसाम, विक्रम राठोड, साजिद शेख, सतीश तोडसाम यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तत्काळ रुंझाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र सर्वांचीच प्रकृती गंभीर असल्याने आरोग्य केंद्राचे एक व तीन वाहने भाड्याने घेऊन चार वाहनातून सर्वजखमींना यवतमाळकडे रवाना करण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.