सावली (तालुका प्रतिनिधी) - सावली-गडचिरोली महामार्गावर मागील 2 वर्शापासुन सुरू असलेले काम निश्कृश्ट व कासवगतीने सुरू असल्यामुळे अनेकदा अपघाताची घटना घडत असतांनाच काल दि. 11 आॅक्टोंबर रोजी रात्रो 10 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर वरून राजनांदगावकडे जाणारा ट्रक किसाननगर जवळ रस्ता खोदकामामुळे पलटला. सदर रस्त्याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाÚयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अपघाताची मालिका सुरूच आहे.
चकपिरंजी ते हिरापूर पर्यंत सुरू झालेल्या कामावर अंदापत्रकानुसार 40 एमएम गिट्टी टाकणे गरजेचे
असतांनाही माती मिश्रीत छोटी-छोटी गिट्टी टाकुन काम करण्यात आले. त्यानंतर हिरापूर ते किसाननगर पर्यंत रस्त्याचे काम करतांना खोदकाम केलेली माती त्याच ठिकाणी टाकण्यात आली. व वरवर मुरूम पसरवुन पुर्ण मुरूच टाकल्याचे भासविल्या जात आहे. त्याचप्रमाणे किसाननगर जवळ रस्ता खोदुन वर्शेभर काम सुरू न केल्याने अनेकदा अपघात झाले. आणि त्याच खोदलेल्या ठिकाणी मातीने बुजविले. मात्र काम पुर्ण न झाल्याने अजुनही अपघाताची मालीका सुरूच आहे.