সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, October 04, 2013

मनसेचे शहर उपाध्यक्षच्या सायबर कॅफेत जावून प्राणघातक हल्ला

 चंद्रपूर-येथील भिवापूर वॉर्डातील विद्यमान नगरसेविकेने रहदारीच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्षाने मनपा आयुक्त व तहसीलदारांकडे केली. या प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी नगरसेविकेच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रकाश चंदनखेडे यांच्या सायबर कॅफेत जावून प्राणघातक हल्ला केला. यात चंदनखेडे याला गंभीर दुखापत झाली असून त्याचेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असताना उलट विद्यमान नगरसेविकेने शहर पोलिसात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा न करताच शहर उपाध्यक्षावर भादंवि ३५४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
मागील काही दिवसांपासून येथील विद्यमान नगरसेविकेने रहदारीच्या जागेवर अतिक्रमण केले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून चंदनखेडे यांनी रेटून धरली. या संदर्भात मनपा आयुक्त, तहसीलदार यांना निवेदनेही दिली आहेत. उद्या या निवेदनावर चर्चा होऊन सदर अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात येणार होते. ही बाब नगरसेविकेला माहिती होताच त्यांच्या नातेवाईकांनी (२ ऑक्टोबर)ला दु. २ च्या सुमारास चंदनखेडे यांच्या सायबर कॅफेत जावून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चंदनखेडे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची तक्रार चंदनखेडे यांनी शहर पोलिसात नोंदविली असता शहर पोलिसांनी चंदनखेडे व अन्य पदाधिकार्‍याचे काहीही ऐकण्यास नकार दिला. क्षणात नगरसेविका आपल्या मुलीसह पोलिस ठाण्यात दाखल होताच तातडीने त्यांच्या म्हणण्यानुसार विनयभंगाची तक्रार दाखल करून घेतली. या प्रकरणात शहर पोलिसांनी कुठलीही चौकशी केली नाही. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.