गोंडवाना क्रांती संघर्ष संघटना
सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे ठाणेदार घुगल यांच्याविरुद्ध गोंडवाना क्रांती संघर्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.
दसरा उत्सव हा आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्सव असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात राजा रावण यांची पूजा अर्चना करण्यात येते. यानिमित्त संभाजी कुमरे, महानंदा टेकाम, मारोती उईके यांनी काही पत्रके कार्यक्रमास्थळी वाटप केली. सम्राट राजा रावण त्यांच्याबद्दल समाजात जागृती व्हावी, हा त्यामागील उद्देश होता. कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर पाथरी येथील ठाणेदार घुग्घुस यांनी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना त्यांच्या शाळेत जाऊन धमकावले आणि पोलिस ठाण्यात तातडीने हजर होण्याची सूचना केली. रावणाची पूजा केल्याप्रकरणी ठाणेदारांनी जातिवाचक शिवीगाळ केली.
आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जाते. यंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. याप्रकरणी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना अटक करण्यात आली.
सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे ठाणेदार घुगल यांच्याविरुद्ध गोंडवाना क्रांती संघर्ष संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.
आदिवासी समाजाकडून भगवान रावणाची पूजा दस-याच्या दिवशी केली जाते. यंदा सावली तालुक्यात सम्राट रावण यांच्याबद्दल जनजागृती करणारी पत्रके वाटण्यात आली. याप्रकरणी सामदा येथील शाळेचे शिक्षक पी. डी. कुमरे यांना अटक करण्यात आली.
या प्रकारामुळे आदिवासीबांधवांची मने दुखावली आहेत. त्यामुळे ठाणेदारांवर अॅक्ट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मानिक सोयाम, धीरज शेडमाके, मनोज आत्राम, मधू मेश्राम, बंडू मडावी, जोतिराव गावळे, मुक्तेश्वर मसराम, अशोक कुळमेथे, पुरुषोत्तम कुमरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. मात्र, अनुसूचित जमातीविरोधी असलेल्या पाथरी येथील ठाणेदार घुघुल यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेऊन आदिवासींच्या भावना दुखावल्या. याप्रकारामुळे आदिवासी समाज अपमानीत झाला असून, त्यांच्यावर अॅक्ट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा जागतिक गोंड सगा मांदी संघटनेने दिला आहे.