सावली- मलेरिया आजाराचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचार्याचा आसोलामेंढा तलावात बुडून मृत्यू झाला, तर पोलिस ठाण्यातील सफाई कामगारामुळे तीन कर्मचार्यांचा सुदैवाने जीव बचावला.
ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. भूपेश आगलावे असे मृताचे नाव आहे. चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचार्यांची चमू सावली तालुक्यातील पाथरी परिसरात मलेरिया आजाराबाबत नागरिकांची तपासणी करण्यासाठी गेली. त्यानंतर सायंकाळी वीस कर्मचारी आसोलामेंढा तलावाच्या नहरात आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले. तेथे पोहण्याचा आनंद लुटताना भूपेश खोल पाण्यात बुडाला. भूपेशला वाचविण्यासाठी इतर तिघे पाण्यात उतरले. पण त्यांना पोहता येत नसल्यामुळे तेही बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच लागलीच पोलिसांची चमू दाखल झाली. सफाई कामगाराच्या पर्शिमामुळे तिघांना बाहेर काढले. पण भूपेशचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत मिळाला नव्हता.