चंद्रपूर। बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून फुलांनी सजविलेल्या एका वाहनातून अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहचल्यानंतर हजारो अनुयायांनी रात्री उशिरापर्यंत अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
यात हजारो अनुयायांसह देश-विदेशातून आलेला भिक्खू संघ व समता दलाचे सैनिक सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत ‘जयभीम’चे नारे देण्यात आले.
यात हजारो अनुयायांसह देश-विदेशातून आलेला भिक्खू संघ व समता दलाचे सैनिक सहभागी झाले होते. अगदी शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत ‘जयभीम’चे नारे देण्यात आले.
मिळेल त्या वाहनांनी आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी येथे गेल्या दोन दिवसांपासूनच हजेरी लावली होती. आज दुपारी बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाची मिरवणूक निघाली. एका सजविलेल्या वाहनातून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो बांधव सहभागी झाले होते. अस्थिकलश मिरवणूक दीक्षाभूमी परिसरात दाखल होताच जय भीमच्या नार्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारापासून भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी अस्थिकलश स्वत:च्या डोक्यावर घेऊन विहारापर्यंत नेला. विहारात अस्थिकलश अनुयायांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांचे पथसंचलन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.या कार्यक्रमानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.