गेल्या काही दिवसांपासून धारिया यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. धारिया यांना थकव्यासोबत श्वसनाचाही त्रास होत होता. मागील दोन-तीन दिवसापासून त्रास वाढल्याने आणि रक्तदाब अचानक कमी झाल्याने शनिवारी त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास धारिया यांची प्राणज्योत मालवली.
महाड तालुक्यातील नाते हे त्यांचे मूळ गाव. मोहन धारिया हे उच्चशिक्षणासाठी पुण्यात आले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजवादी विचारसरणीचे असलेले धारिया हे सुरुवातीला प्रजा समाजवादी व नंतर काँग्रेस पक्षात दाखल झाले.
धारिया १९५७ ते १९६० या कालावधीत पुणे महापालिकेचे सदस्य होते. यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते.
१९८० साली निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर धारिया राजकारणातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर धारिया यांनी ‘वनराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे गावागावांमध्ये वृक्षारोपण आणि बंधारा बांधून पर्यावरण रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यसैनिक धारिया यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता.
मोहन धारीया | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. १९७१ | |
मागील | एस.एम. जोशी |
---|---|
पुढील | विठ्ठल नरहर गाडगीळ |
मतदारसंघ | पुणे |
कार्यकाळ इ.स. १९७१ – इ.स. १९७७ | |
मागील | एस.एम. जोशी |
पुढील | मोहन एम. धारीया |
मतदारसंघ | पुणे |
कार्यकाळ इ.स. १९७७ – इ.स. १९८० | |
मागील | मोहन एम. धारीया |
पुढील | विठ्ठल नरहर गाडगीळ |
मतदारसंघ | पुणे |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष |
निवास | पुणे |