সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 29, 2013

477 समित्या करणार वनाचे संरक्षण

संरक्षणासाठी 80 हजार हेक्टर वनक्षेत्र वनसंरक्षण समितीला

चंद्रपूर दि.29- चंद्रपूर, ब्रम्हपूरी व मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणारे 80 हजार 296 हेक्टर वनक्षेत्र 477 वनसंरक्षण समित्यांना वनसंरक्षणासाठी हस्तांतरीत करण्यात आले असून या वनातून निघणा-या वनौपजाची विक्री झाल्यानंतर उत्पन्नाच्या 20 टक्के वाटा या समित्यांना मिळणार आहे.

शासनाने 1995-96 पासून संयुक्त वनव्यवस्थापना योजना राज्यात सुरु केली असून चंद्रपूर वनवृत्तातील चंद्रपूर, ब्रम्हपूरी व मध्यचांदा या तीनही वनविभागात ही योजना प्रभावीपणे राबविली गेल्यामुळे वनाचे उत्कृष्ट संवर्धन झाले आहे. वन संवर्धनात उत्सुक असणा-या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती तयार करण्यात येते. या समितीमार्फत वनाचे संवर्धन करण्यात येते व वनौपजातून मिळणा-या उत्पन्नाचा 20 टक्के उत्पन्न सदर समितीला देण्यात येते.

चंद्रपूर वनविभागात 142 वनसंरक्षण समित्या असून त्यांना 18 हजार 389 हेक्टर वनक्षेत्र, ब्रम्हपूरी वनविभागात 193 समित्यांना 48 हजार 977 हेक्टर वनक्षेत्र व मध्य चांदा विभागातील 142 वनसमित्यांना 12 हजार 939 हेक्टर असे 477 समित्यांना एकूण 80 हजार 296 हेक्टर वनक्षेत्र संरक्षणासाठी वाटप करण्यात आले आहे. यासाठीचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यास शासनाने मंजूरी प्रदान केली आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन समित्या आपल्या गावालगतच्या वनाचे संरक्षण करतात. त्यामुळे वनविभगाला गावक-यांचा खूपमोठा हाताभार लागतो. यासोबतच वनविभाग घरघुती गॅस, बायोगॅस, सोलर फेन्सिंग व रोपवने यासारख्या उत्पन्न वाढविणा-या योजना या गावाक-यांसाठी राबवित आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे कार्य चांगले आहे व त्याचा वनसंवर्धनासाठी खूप फायदा होत आहे. त्या मोबदल्यास गावक-यांना वनौपजाच्या उत्पन्नाच्या 20 टक्के वाटा वनसमित्यांना देण्यात येतो. त्यामुळे त्यांचेही उत्पन्नात भर पडते असे मुख्य वन संरक्षक संजय ठाकरे यांनी सांगितले. यासोबत गावाच्या विकासासाठी वनविभाग विविध योजना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.