चंद्रपूर- दुर्मिळ खनिज संपत्ती , माओवादी आणि आतंकवाद्यांचा धोका हे लक्षात घेवून सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपुरातील चौकात आता लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. पोलिस प्रशासनाने तसे संकेत दिले आहेत.
कॅमेरे लावण्याचे नियोजन प्रयोग गणेशोत्सवादरम्यान शहरात करण्यात आला होता. शहरातील गांधी चौक, गिरनार चौकात हे कॅमेरे लागले होते. हेच दोन ठिकाण निश्चित झाले असून उर्वरित चौकांबद्दल अभ्यास सुरू आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. त्याला अंतिम रूप देणे सुरू आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील , असा विश्वासही सूत्रांनी व्यक्त केला. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील नक्षली कारवाया थंडावल्या असल्या तरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे कॅमेरे महत्त्वपूर्ण ठरतील.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा नियंत्रण कक्ष कुठे ठेवायचा , त्याची यंत्रणा नेमकी कशी राबवायची यावर अभ्यास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुरुवातीस दोन निश्चित चौक स्थानावर हे कॅमेरे लावले जाणार असून टप्प्याटप्याने त्यात वाढ केली जाणार आहे. यासोबतच पोलिस विभाग शासकीय निधी मार्फत हे शक्य होऊ शकेल का यावर विचार केला जात आहे. आतंकवादी , नक्षली आणि संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर हे मोठे पाऊल मानले जात आहे. म्हणूनच चांगल्या गुणवत्तेचा कॅमेरा ठेवायचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या हा प्रयोग चंद्रपूर शहरातच राबविला जात आहे.
चंद्रपूर शहरानजीक आशियात गणले जाणारे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र असून भद्रावतीजवळ आयुध निर्माणी आहे. फेरो अलॉयचा कारखाना असून सिमेंट व कागद कारखाना आहे.
या साऱ्यांची सुरक्षितता आवश्यक आहे. दरम्यान , व्यापाऱ्यांनादेखील दुकान व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. यात ज्वेलर्स व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बैठकीत व्यापाऱ्यांनी तशी तयारी दर्शविली होती.