সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 02, 2013

अमोल मालेकर यांचे अपघातात निधन

चंद्रपूर - दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती अमोल मालेकर (वय ३२) यांचे भद्रावतीजवळ अपघातात निधन झाले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीने भद्रावती येथून चंद्रपूरकडे येत असताना मागून आलेल्या मेटाडोर क्र. एमपी -०१ वाय ६६१७ ने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी चालकाने गुन्हा मान्य करीत पोलिसांच्या स्वाधीन झाला. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आव्हाड करीत आहेत. अमोल मालेकर हे मूळचे वणी तालुक्यातील तेजापूर (जि. यवतमाळ ) येथील असून, चंद्रपुरातील रामनगर येथे राहत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह विसापूर येथील भारती टोंगे यांच्याशी झाला होता. त्या सकाळ वृत्तपत्रात चंद्रपूर कार्यालयात कार्यरत आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.