সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 21, 2013

मनसेच्या जिल्हाध्यक्षांना कार्यकत्याकडूनच मारहाण

वरोरा दौ-यादरम्यान विश्रामगृहातील घटना
वरोरा,   : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांच्यावर वरोरा येथील का‘गार सेनेच्या कार्यकत्यानी प्राणघातक हल्ला केला. वरोरा दौ-यादरम्यान विश्रामगृहात बैठक घेत असताना सोमवारी (ता. २१) ही घटना घडली. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी कामगार सेनेचे उमेश बोढेकर यांच्यासह कार्यकत्र्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. त्यात विजय मराठे यांना भद्रावती-वरोरा या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर रोजी विजय मराठे आपल्या काही पदाधिका-यांना घेऊन भद्रावती-वरोरा तालुक्याच्या दौ-यावर गेले होते. येथील विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रमुख तथा राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश बोढेकर आपल्या कार्यकत्र्यांसमवेत येऊन मराठे यांना लाथाबुक्यांनी मरहाण केली. यावेळी एका कार्यकर्तेयाने लोखंडी पाइपने डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर दुखापत झाली. दरम्यान, मराठे यांचेही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याम‘ुळे म‘ोठी घटना घटली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांत पूर्वीपासूनच दोन गट आहेत. हाच वाद पुन्हा उङ्काळून आला. विजय मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी उ‘ेश बोढेकर आणि त्यांच्या सहका-यांविरुद्ध भादंवि कलम‘  १४३, १४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.