সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 23, 2013

उमेश बोढेकर यांच्यासह सात मनसे कार्यकर्त्यांना अटक

चंद्रपूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी काल सोमवार (२१ ऑक्टोबर)ला मनसे कामगार नेते उमेश बोढेकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.  पोलिसांनी मनसेचे कामगार नेते उमेश बोढेकर यांच्यासह सात मनसे कार्यकर्त्यांना अटक केली.
मागील काही दिवसापासून मनसेच्या कार्यकर्त्यांत पदाच्या वाटपाला घेऊन वाद चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसापूर्वी अशाच एका पदाचे वितरण झाले असता मनसे कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली. या प्रकरणाची शाई वाळायची असतानाच आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. काल सोमवारला दुपारच्या सुमारास मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी एका बैठकीचे आयोजन शासकीय विर्शामगृहात केले होते. ही बैठक आटोपून परतत असताना मनसेचे कामगार नेते उमेश बोढेकर यांनी मराठेवर आपल्या साथीदारांसह हल्ला चढविला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेल्याने बोढेकरांनी पळ काढला. या विषयाची गंभीर दखल घेत मनसे महिला जिल्हाध्यक्ष अमृता सूर यांनी आता विजय मराठे यांच्यावर आपली तोफ डागली आहे. सूर म्हणाल्या, वरोरा-भद्रावती क्षेत्रात काँग्रेसचे प्राबल्य असताना माझे पती प्रवीण सूर यांनी मनसेचा पाया या क्षेत्रात मजबूत केला. त्यांच्याच मार्गदर्शनात बोढेकर काम करीत होते. बोढेकर यांच्या प्रयत्नाने अनेकांना न्याय मिळाला. पक्षाचे काम सुरळीत सुरू असतानाच मराठेंनी बोलाविलेल्या बैठकीत कोणत्याही मनसेच्या जबाबदार पदाधिकार्‍यांना बोलविण्यात आले नव्हते. सोबतच त्यांनी ज्या व्यक्तीने या जिल्हय़ात मनसेचा पाया रोवला त्यांच्याबाबत अपमानजनक उद्गार काढले. या संदर्भात जाब विचारण्यासाठी बोढेकर आणि मराठे यांच्यात बाचाबाची झाली. परंतु, मराठेंनी प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगून मनसेच्या कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पोलिसांचीही दिशाभूल केली आहे. मराठे औद्योगिक क्षेत्रातून अवैध वसूली करीत असतात, असा गंभीर आरोप सूर त्यांनी पत्रपरिषदेत केला. मराठेंचे हे नाट्य बोढेकरांना बदनाम करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.