ब्रह्मपुरी : नगरपालिकेच्या
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यात नगराध्यक्षपदी लोकमंच
विकास आघाडीचे संदीप आमले तर उपाध्यक्ष पदी आघाडीचेच सतिश हुमने यांची
अविरोध निवड झाली.
मागील एक वर्षापासून ब्रह्मपुरी नगरपालिकेला ग्रहण लागले होते. प्रथम नऊ नगरसेवक पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र झाले होते. त्यात तत्कालिन नगराध्यक्षाचा समावेश होता. त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त होते. त्यानंतर नऊ अपात्र नगरसेवकांच्या जागेवर पोटनिवडणूक होऊन नव्याने नऊ नगरसेवक निवडण्यात आले. परंतु अपात्र नगरसेवकांनी न्यायालयातून स्टे आणला. गटनेते अशोक भैय्या यांनी प्रयत्न करुन स्टे हटविल्यामुळे आज नगरपालिकेच्या सभागृहात निर्वाचन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये लोकमंच विकास आघाडीचे संदीप आमले नगराध्यक्षपदी तर आघाडीचेच सतिश हुमने उपाध्यक्षपदी अविरोध विजयी झाले.