वाहन मालकांवर गुन्हे दाखल करा
चंद्रपूर दि.23- सन 2012-13 मध्ये जिल्हयातील लिलाव झालेल्या रेतीघाटचा कालावधी 30 सप्टेंबर 2013 रोजी संपुष्ठात आलेला असून नवीन रेतीघाट लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनास एक ते दिड महिण्याचा कालावधी लागणार आहे. या कालावधी दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे रेतीघाटामध्ये तसेच लिलाव न झालेल्या नदी, नाल्याच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकीवर आळा घालण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार यांनी प्रत्येक तालुक्यात संबंधीत पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार करण्यात येवून रेतीचे अवैध वाहतुक करीत असलेले ट्रक/ट्रक्टर जप्त करुन संबंधित वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. तसेच रेती घाटावर जाणा-या मार्गात खोदून अडथळा निर्माण करुन रेतीचे अवैध वाहतुक करणा-या ट्रक/ट्रक्टरची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांना दयावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दयावे असे जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी संबंधित यंत्रणेला सुचना दिलेल्या आहेत.