সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, October 27, 2018

या कंपनीत कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये मिळते Car,Fd,आणि Flat गिफ्ट

काव्यशिल्प/ऑनलाईन:
दिवाळ सण आला की प्रत्तेक कर्मचा-यांनाब बोनसची उत्सुकता लागते दिवाळी सणांत कर्मचा-यांना बोनस सोबत भेटवस्तूही दिल्या जातात. पण सूरतमधले प्रसिद्ध हिराव्यापारी सावजी ढोलकीया मात्र आपल्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका किंवा गाड्या देतात. दिवाळी आली की सावजी ढोलकिया चर्चेत येतात. यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कार आणि एफडी गिफ्ट दिले आहे.
गुजरातच्या या हिरे व्यापाऱ्याने सलग चौथ्या वर्षी कर्माचऱ्यांना बंपर बोनस दिला आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी बोनस म्हणून त्यांच्या सहाशे कर्मचाऱ्यांना कार आणि नऊशे कर्मचाऱ्यांना बॅंकेत एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) भेट म्हणून दिली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटआणि बोनस देण्यासाठी त्यांनी ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. 
‘हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संस्थापक सावजी ढोलकीया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत नेहमीच चर्चेत असतात.सावजी काका या टोपण नावाने ते हिरा व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कंपनीत सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल वर्षाला सहा हजार कोटी रुपये आहे. त्यांची कंपनी सुमारे ५०देशांमध्ये हिऱ्याची निर्यात करते.
त्यांनी सहाशे कर्मचाऱ्यांना मारुति सोलानो आणि रेनॉल्ट क्विड मॉडेल भेट म्हणून दिले आहे. त्यांच्या तीन व्यवस्थापकांना त्यांनी मर्सिडिज कारही दिली आहे. त्यांची किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये आहे. २०१७मध्ये ढोलकिया यांनी बाराशे कर्मचाऱ्यांना कार दिल्या होत्या. दिवाळीतील बोनस म्हणून ५१ कोटी रुपये खर्च केला होता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.