महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र आंतरगृह क्रिडास्पर्धा
2018 उद्घाटन समारंभ जल्लोषात संपन्न
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र राज्यस्तरीय आंतरगृह क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन 04.10.2018 रोजी सकाळी शक्तीमान क्रिडा संकुल नाशिक औष्णिक केंद्र येथे श्री. कैलाश चिरुटकर, कार्यकारी संचालक (संचलन व सुव्यवस्था -१) महानिर्मिती यांच्या हस्ते जल्लोषात झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंतरगृह क्रिडा समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता श्री. उमाकांत निखारे यांनी भुषविले. मान्यवरांचे खुल्या जिप्सीमधून ढोल पथकासोबत क्रिडासंकुलात आगमन झाले. विविध विद्युत केंद्रातील एकूण ११ संघानी मार्च पास करत बॅण्डपथकाच्या तालावर मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर श्री. कैलाश चिरुटकर, यांच्या हस्ते महानिर्मितीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सोबत महानिर्मितीचे गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले व मान्यवरांनी क्रिडास्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
यानंतर राष्ट्रीय पातळीवरील नामांकीत खेळाडू सर्वश्री मनोज माळवे, तुलसीराम शेजवळ, गणेश शिंदे व सौ. लिना पाटील यांनी रिले पध्दतीने क्रिडा ज्योत मैदानात आणली. त्यानंतर मुख्य क्रिडा ज्योतीचे मान्यवरांचे हस्ते प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी श्री. कैलास चिरूटकर, श्री. नितिन चांदुरकर, कार्यकारी संचालक (माहिती तंत्रज्ञान), श्री. उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.कें., श्री. एन. एम. शिंदे, मुख्य अभियंता (सौर ऊर्जा), श्री. आनंद भिंताडे, मुख्य महाव्यवस्थापक (ना.प्र.कें.), श्री. नितिन वाघ, मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण व सुरक्षितता), श्री. अनिल मुसळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, श्री. सुनील इंगळे, उप मुख्य अभियंता (प्रशासन), श्री. राकेशकुमार कमटमकर, अधिक्षक अभियंता, श्री. शशांक चव्हाण, अधिक्षक अभियंता, श्री. मनोहर तायडे, अधिक्षक अभियंता (स्था), श्री. आर. पी. कुमावत, अधिक्षक अभियंता (नवकरणीय ऊर्जा), श्री. राहुल दुबे, कंपनी सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी श्री.अनिल मुसळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले त्यामध्ये त्यांनी खेळामुळे उर्जा निर्माण होते तसेच महानिर्मितीची ओळख राष्ट्रीय स्तरावर होईल तसेच महानिर्मिती कंपनी ही विज निमिर्तीमध्ये अग्रेसर आहेच पण तरी खेळामध्ये महानिर्मिती ठसा उमटवेलच असे त्यांनी सांगीतले. तद्नंतर श्री. नितिन चांदुरकर, यांनी, खेळामुळे कामामध्ये उर्जा निर्माण होऊन महानिर्मिती अजुन उंच पल्ला गाठेल असे सांगीतले तसेच सांघिक भावना जोपासुन खिलाडुवृत्तीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संघ व्यवस्थापक व कल्याण अधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.कैलाशजी चिरुटकर, यांनी या खेळाच्या माध्यमातून सांघिक कामगीरी करुन सर्वांमध्ये सुसंवाद साधून विजय कसा मिळवता येतो याचबरोबर काही कारणांनी पराभव झालाच तर तो पचवता येणे गरजेचे आहे असेही सांगीतले. खेळामुळे मन व शरीर कणखर बनते याचाच उपयोग दैनंदिन कामकाजात होतो व क्षमता वाढते तसेच महानिर्मितीची भरभराट होते. खेळाडुंनी खिलाडुवृत्तीने खेळावे व सुसंवाद साधुन विजय मिळवावा यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषण श्री.उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.केंद्र, एकलहरे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यालयाने आमच्यावर विश्वास ठेवून क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानले. तसेच खेळाडु, विभाग प्रमुख, आयोजन समिती यांचे आभार मानले. या खेळासाठी खेळाडूंना अनेक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या असुन ना. औ. वि. केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्याची माहिती घेउन आपल्या केंद्रात त्याची अंमलबजावणी करावी जेणेकरून महानिर्मितीची प्रगती होईल.
त्यानंतर श्री. उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, ना.औ.वि.केंद्र, एकलहरे यांचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. कैलाश चिरुटकर, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कल्याण अधिकारी श्री.निवृत्ती कोंडावले यांनी आभार प्रदर्शन केले. ना.औ.वि.केंद्र एकलहरेचे मुख्य अभियंता श्री. उमाकांत निखारे हे आयोजनाचे प्रेरणास्त्रोत असून संघामध्ये व आयोजन समितीमध्ये एकोप्याची भावना निर्माण केली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. सुर्यकांत पवार, कार्यकारी अभियंता यांनी केले. आयोजन समितीमधील सर्वांनीच खुप मेहनत घेतली त्यामुळे या क्रिडास्पर्धांचे आयोजन दिमाखदार होवू शकले. याप्रसंगी विविध संघटना, पत्रकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी, कंत्राटदार आणि कंत्राटी कामगार वसाहतवासी मोठया संख्येने उपस्थित होते.