दसरा संपल्यानंतर आता नागरिकांना दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीचे दिवस म्हटले की, खरेदी ही आलीच. घर खर्च तसेच दिवाळी खरेदीचे आर्थिक नियोजन करायचे असल्यास बँकेतून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण ऐन दिवाळीत चार दिवस बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी पैशांची जुळणी करायची असेल तर त्याचे नियोजन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याआधी करून घ्या.
ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असे दोन दिवस बँका बंद असतील. त्यानंतर शुक्रवारी येणाऱ्या भाऊबीजेनंतर शनिवारी, ९ नोव्हेंबर व रविवार ११ नोव्हेंबर अशी दोन दिवस सुट्टी असेल.