चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी श्रद्धेय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल माजी गृहमंत्री भारत सरकार यांची जयंती व माजी पंतप्रधान प्रियदर्शनी भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त व्यापक स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन मातोश्री सभागृह तुकूम चंद्रपूर येथे सकाळी 11ते 5 वाजेपर्यंत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार विजय भाऊ वडेट्टीवार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल, प्रमुख उपस्थिती माजी आमदार सुभाष भाऊ धोटे,मा.प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष,काँग्रेस कमिटी माननीय नंदू भाऊ नागरकर शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी,चित्राताई डांगे महिला अध्यक्ष काँग्रेस कमिटी, डॉ.विजय देवतळे, डॉ.आसावरी देवतळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,विनायक बांगडे, वीरेंद्र(बल्लू)गोहोकार,सुभाष गौर, नंदाताई अल्लुरवार, हरीश कोत्तावार युवक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस,सुनिता अग्रवाल महिला शहर अध्यक्ष,सुनिता लोढिया सदस्य,स्वप्निल तिवारी एम यु सी आय अध्यक्ष उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल तर्फे करण्यात येत आहे. असे शिरीष तपासे अध्यक्ष, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनी कळविले. तरीही या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन रक्तदानास सहकार्य करावे असे आवाहन शिरीष तपासे यांनी केले आहे.