चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
एकीकडे संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची चंद्रपुरात मात्र ऐसीतैसी बघायला मिळाली. चंद्रपूरातील लालपेठ परिसरातील वेकोलिच्या वसाहत परिसरात स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली वाहण्यात आल्याचे उदाहरण समोर आलेले आहेत.
शहरातील लालपेठ परिसरात वेकोलिची मोठी वसाहत आहे, या वसाहती वेकोलीच्या हजारो कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे.याच परिसरात असा अस्वच्छतेचा कळस गांधी जयंतीच्या दिवशी बघायला मिळाला आहे.वसाहतीतील नागरिकांनी याबाबतची तक्रार सोशल मिडीयावर शेअर केली.
एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवण्याच्या संकल्पनेकडे देश वळत असताना वेकोलिचे अधिकारी व कर्मचारी हे २ ऑक्टोबरला हातात झाडू घेऊन रस्त्यावर निघून चार हात झाडू मारत तर होते मात्र बरेच कर्मचारी यात फोटोबाजी करताना दिसले. ज्या परिसरात वेकोली प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जात होते त्याच परिसारत वसाहतीतील अस्वच्छ नाल्या,पडलेला कचरा दिसून आला. मात्र स्वच्छ करायला २ ऑक्टोंबरला कोणीही समोर आलेले नाहीत.
साफ सुत्रा रस्त्यावर तर कोणीही चमकोगिरी करू शकतो मात्र वेकोली परिसरात आजही कचऱ्याचे गचकरण हे नागरिकांना चांगलेच सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोग राई पसरण्यात आणखी मदत होत आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या घटकांमध्ये स्वच्छ व शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तिक स्वच्छता , परिसर स्वच्छता/ गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचर्याचे योग्य व्यवस्थापन मानवी विष्ठेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) अश्या घटकांचा समावेश आहे. मात्र या वसाहतीत आजही यापैकी बहुतांश समस्या या नागरिकांचा पाठलाग सोडायला तयार नाही.तुंबलेल्या नाल्या,नाल्यावरील कचरा, ह्या प्रत्येक वसाहत ब्लॉक मध्ये बघायला मिळत आहे,
वेकोली परिसरातील अरिया हॉस्पिटल परिसरात देखील कामालीची अस्वच्छता बघायला मिळाली. येथे आल्यांनतर रुग्ण बरा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, या घाणीमुळे आणखी आजार वाढण्याची शक्यता बळावली आहे.येथील नाल्या या तुंबलेल्या असून आजूबाजूने या नाल्यावर कचऱ्याची चादर ओढलेली आहे. स्वच्छतेकडे रुग्णालय प्रशासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.याची तक्रार करूनही वेकोली प्रशासन आणि स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.