সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 01, 2018

संपर्कहीन पेमेंट कार्डांमुळे भारताला रोखरहित होण्यास मदत

नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालातून असे दिसून आले की, गेल्या दोन वर्षांत डिजिटल वित्तव्यवहारांची आकडेवारी वाढली असल्याने चलनाची देवाणघेवाणही वाढली असून २०१८ मध्ये हा आकडा १८.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण १३.३५ लाख कोटी रुपये तर, २०१६ मध्ये १६.६३ लाख कोटी रुपये होते. यातून हेच सिद्ध होते की, सरकारने डिजिटल पेमेंट्सवर जास्तीत जास्त भर दिला असला तरीही आजही भारत रोख वित्तव्यवहारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

ई-पेमेंट्स हा भारताच्या रोख व्यवहारांवर अवलंबून राहण्याला एक आश्वासक पर्याय ठरत असून त्यातही काही अडथळे आहेत. बेन अॅण्ड कंपनी आणि गुगलच्याअहवालानुसार, भारतातील ३९० दशलक्ष लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याने भारत हा इंटरनेट वापराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तरीही, यातील केवळ १६० दशलक्ष लोकच ऑनलाईन वित्तव्यवहार करतात. जे लोक ऑनलाईन वित्तव्यवहार करतात, त्यांच्यापैकी ५४ दशलक्ष लोकांनी पहिल्या खरेदीनंतरच ऑनलाईन व्यवहार बंद केले. ही तुलना करता, आरबीआयच्या नव्या आकडेवारीनुसार, ९८० दशलक्षहून अधिक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सची देवाणघेवाण व व्यवहार चालतो. तसेच, एकूण कार्ड व्यवहारांपैकी ७७ टक्के व्यवहार हे एटीएमच्या माध्यमातून केले जातात. यातून हे स्पष्ट होते की, पीओएसच्या माध्यमातून कार्ड व्यवहार सोपे केल्यामुळे, ग्राहकांना कार्ड पेमेंट्सऐवजी रोख रकमेचे विथड्रॉव्हल करणे अधिक सोयीस्कर जाईल.

हे शक्य करण्यासाठी, वित्तमंत्रालयाने नुकताच एक उपाय राबवला आहे. मंत्रालयाने थेट सल्लागार बॅंकांना नियर-फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी)सक्षम संपर्कहीन क्रेडिट आणि डेबिट कार्डे सादर करण्याचा आदेश दिला आहे. नावाप्रमाणेच, संपर्कहीन पेमेंटकार्डांमुळे ग्राहक पेमेंट करण्यासाठी पीओएस टर्मिनल्सवर केवळ एका टॅपने व्यवहार पूर्ण करू शकतात. पेमेंट्स पूर्वीपेक्षा अधिक वेगाने करण्यासाठी, संपर्कहीन कार्डांमधून होणारे व्यवहार हे केवळ तीन किंवा कमी सेकंदांत होतात.परिणामी, ग्राहकांचा प्रतिक्षाकाल कमी होत असून त्यांना त्वरीत पेमेंट अनुभवाचा आस्वादही घेता येतो. रिटेलर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर, यामुळे त्यांना वाढीव महसूल आणि क्रॉस विक्रीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ जास्त मिळतो आणि त्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागणे कमी होते.

व्हिसाच्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे समुह देश व्यवस्थापक टीआर रामचंद्रन यांच्या मते, “आज डिजिटल पेमेंट्सचे असंख्य पर्याय ग्राहकांसमोर खुले असूनही यापैकी बऱ्याचशा यंत्रणा विनादिक्कत पेमेंट अनुभव देण्यात कमी पडतात. परिणामी, लोक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळतात. केवळ एका टॅपवर वित्तव्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केल्यामुळे, संपर्कहीन कार्डांच्या माध्यमातून ग्राहक डिजिटल व्यवहार करण्याप्रति अधिक ठाम राहतील. ही सुविधा केवळ विनादिक्कतच नव्हे तर, वेगवान आणि सुरक्षितही आहे.’’

ऑस्ट्रेलियात रिझर्व्ह बॅंक ऑफ ऑस्ट्रेलियातील संशोधकांच्या निरीक्षणातून असे दिसून आले की, २०१६ मध्ये पीओएस व्यवहारांपैकी एक तृतीयांश व्यवहार हे संपर्कहीन कार्डांच्या माध्यमातून करण्यात आले. २०१३ च्या तुलनेत हा आकडा ३० टक्क्यांनी वाढला होता. आज ऑस्ट्रेलियात ९४ टक्के व्यवहार अशाच संपर्कहीन कार्डांच्या माध्यमातून केले जातात. द गार्डियनने नुकत्याच केलेल्या अभ्यासांती असे दिसून आले की यूकेमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण २०१६ मध्ये ४० टक्क्यांनी घटले असून२००६ मध्ये हे प्रमाण ६२ टक्के होते. परिणामी, संपर्कहीन कार्डांच्या वापराला अधिक चालना मिळाली.

आपल्याकडे भारतात, संपर्कहीन कार्डांचा प्रसार वाढवण्यासाठी व्हिसासाररखे पेमेंट कार्ड पुरवठादार त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करीत असून नवीन तंत्रज्ञानाच्या स्वीकारासाठी नवनवीन टचपॉईंट्स तयार होत आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.