नागपूर/प्रतिनिधी:
पैसे कमवायच्या लालसेपोटी शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुटुंबीयांपासून लपून धूम्रपान करणाऱ्या किंवा इतर व्यसन करणारे शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी या टोळीचे सूत्रधार हे विध्यार्थ्यांवर लपून लक्ष ठेवत होते आणि विध्यार्थी व्यसन करतांना दिसला कि त्याला उचलून टोळीच्या सूत्रधाराच्या घरी नेण्यात येत होते.२६ सप्टेंबरला आरोपींनी खंडणीसाठी अयोध्यानगर येथील रहिवासी हिमांशु सुनील कातरे याचे अपहरण केले.व त्याला दमदाटी करून मारहाण केली.आरोपींनी हिमांशुला अधिक पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हिमांशुचे फोटो त्याच्या वडिलांना पाठवून खंडणी मागितली. हिमांशुने रक्कम आणून देण्याचे आश्वासन दिले. तेथून तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
दोन दिवसांपूर्वी हिंमत करून पीडित कुटुंबीयांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाचा खुलासा झाला.
भीतीपोटी कुणीच या टोळीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखविली नसल्याने या टोळीतील सदस्यांचे चांगलेच फोफावत होते.त्यानंतर हिमांशु आणि त्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३६३, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून टोळीचा सूत्रधार बिट्टु, प्रज्ज्वल आणि फैजानला अटक केली. टोळीतील इतर सदस्य अद्यापही फरार आहेत.