- सुभाष चंद्रा फाऊंडेशनतर्फे पहिलेवहिले याचिका व्यासपीठ सादर
- १०,००० हून अधिक सह्या असलेल्या याचिकांमध्ये श्री. सुभाष चंद्रा स्वत: लक्ष घालून या याचिका संबंधित अधिका-यांपर्यंत पोहोचतील याची खातरजमा करणार
- 'वैष्णव जन तो' या महात्मा गांधीजींच्या दैनंदिन प्रार्थनेच्या सुमधूर नव्या रुपातून गांधी जयंतीनिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ
- प्रख्यात संगीतकार अमित त्रिवेदी आणि नावाजलेली गायिका जोनिता गांधी यांनी हे लोकप्रिय हिंदू भजन देशातील तरुणांना भावेल अशा समकालीन रुपात नव्याने मांडून या उपक्रमाला साथ दिली आहे
- नागरिकांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून सुभाष चंद्रा (SACH) फाऊंडेशनने गांधी जयंतीनिमित्त 'देश का सच' हा या प्रकारचा पहिलाच डिजिटल उपक्रम सादर केला. नागरिकांसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आणि मुद्दे ऐरणीवर आणण्यासाठी त्यांना एक सामाजिक व्यासपीठ उपलध करून देण्याच्या उद्देशाने श्री. सुभाष चंद्रा यांनी ही संकल्पना मांडली होती. यातून तयार झालेले देश का सच (www.deshkasach.in) हे जनहित याचिकांसाठीचे एक थांबा व्यासपीठ असेल.
- सार्वजनिक प्रश्नांबद्दल सजग असलेले आणि सकारात्मक बदल घडवून आणू इच्छिणारे नागरिक इथे याचिका दाखल करू शकतात किंवा इतर याचिकांना पाठिंबा देऊ शकतात. १०,००० हून अधिक लोकांचा पाठिंबा असलेल्या याचिकांमध्ये श्री. सुभाष चंद्रा स्वत: लक्ष घालतील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष्यित प्रयत्नही करतील.
- या व्यासपीठाबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करताना एसएसीएच या आपल्या सामाजिक कार्य विभागाचे प्रतिनिधी म्हणून श्री. सुभाष चंद्रा म्हणाले, "गेल्या काही वर्षांत, आपल्या समाजाला भेडसावत असणा-या रुढी आणि प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी मी छोट्या व मोठ्या पडद्याचा वापर केला आहे. मात्र, या महान देशाचा एक नागरिक म्हणून, माझा ठाम विश्वास आहे की देशाला अधिक महान बनवणे आणि देशाचा विकास करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. 'देश का सच' हा प्रत्येक नागरिकाला भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्यांशी संबंधित मुद्दयांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना एकमेकांना मदत करणे शक्य होईल हे पाहणे, हा आमचा प्रयत्न आहे. हा देश आपला आहे आणि म्हणूनच जबाबदारीही आपली आहे, या क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवत नागरिक हे माध्यम वापरतील, अशी मला आशा आहे
" - या उपक्रमासाठीची प्रेरणा 'वैष्णव जन तो' या अत्यंत प्रसिद्ध अशा हिंदू भजनावरून घेण्यात आली आहे. प्रख्यात संगीतकार अमित त्रिवेदी आणि लोकप्रिय गायिका जोनिता गांधी यांनी या भजनाला दिलेल्या सुरेल नव्या रुपासह हा उपक्रम सादर करण्यात आला. १५व्या शतकातील संतकवी नरसी मेहता यांनी लिहिलेले, समानता, इतरांचा मान ठेवणे आणि संकटात असलेल्यांची मदत करणे यावर भर देणारे हे भजन अगदी आज २१व्या शतकातही अर्थपूर्ण ठरते.
भारताला जागतिक स्तरावर नेणे आणि देशासमोरील प्रश्न सोडवणे या फाऊंडेशनच्या तत्वांनुसार श्री. चंद्रा विविध सामाजिक व विकास उपक्रमातून सातत्याने मानवी मूल्यांना चालना देण्यात आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना सक्षम करण्यात गुंतवणूक करत असतात.