राष्ट्रीय महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
चौदामैल चौक टि पाँईट परिसरातील घटना
तात्काळ गतिरोधक (ब्रेकर) लावण्याची स्थानिकांची मागणी
येथून जवळच असलेल्या कळमेश्वर पोलीस स्टेशन ठाणा हद्दितील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौदामैल चौक कळमेश्वर वळण रस्त्यावर ट्रेलर ट्रक वळण घेत असता फळ विक्रेत्या महीलेचे रस्ता ओलांडत असतांनी ट्रेलर ट्रकखाली येऊन काळाने झडप घेतली.
सविस्तर वृत्त प्राप्त माहिती नुसार नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मंगळवार (९/आॕक्टोंबर) सकाळी ९.०० वा. दरम्यान चौदामैल चौक परिसरात फळ विक्रेता महिलेचे छोटेसे दुकान असून ती रोडच्या पलीकडे जाऊन आपल्या दुकानात नास्ता घेऊन वापसी परतीला महामार्ग रस्ता ओलांडत असतांनी नागपूरवरुन अमरावती ला भरधाव वेगात अज्ञात आयसर ट्रक जात असता.. महिला अर्ध्या मार्गावर (मधल्या रस्त्यावर) उभी होती. त्याचवेळी कळमेश्वर वळण मार्गाने येत असलेला ट्रेलर ट्रक आरजे १९ जिई २७०२ क्रमांकाचा नागपूर दिशेने वळण घेतेवेळी भरधाव जात असलेला अज्ञात आयसरने उभ्या असलेल्या महिलेला कट दिला व ट्रेलर ट्रक ला धडक देऊन सरळ महामार्गानी पसार झाला. त्याचवेळी महिला संकटात सापडल्याने ती घाबरून मागे सरली तर काय चक्क ट्रेलर ट्रकखाली आल्यानी तिच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्यानी दुर्गा शेरसिंग ठाकरे (३५) राहणार वार्ड क्रमांक पाच साईमंदीर जवळ गोंडखैरी हिचा जागिच मृत्यू झाला. व बघ्याची गर्दी वाढली.
घटनेची माहीती तिचा पती शेरसिंग ला मिळताच मृतक महिलेचे दोन लहान मुले (एक सात वर्षाचा तर दुसरा बारा वर्षाचा) घटनास्थळावर येऊन आई-आई बोलून रडू लागले.
तात्काळ घटनेची माहिती शेख कैश यांनी कळमेश्वर पोलीसांना दिली. व कळमेश्वर पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन तसेच खुर्सापार वाहतुक पोलीस मदत केंद्रातील साहयक पोलीस उपनिरिक्षक प्रकाश हिवरकरसह अन्य वाहतुक पोलीसकर्मी दाखल होऊन बघ्याच्या गर्दीला आवरुन ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग सुरळीत करण्यात आला. व पंचनामा करुन मृतक महिलेला उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वरचे ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अज्ञात आयसर ट्रकच्या तपासाला सुरवात करुन ट्रेलर ट्रक ताब्यात घेण्यात आला.
पुढील तपास कळमेश्वरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पिएसआय अमोल सांगळे, सुशिल धोपटे, एएसआय राजेंद्र यादव, हेडकाँस्टेबल भोजराज तांदुळकर, अतूल खोडनकर, ललीत उईके पुढील तपास करीत आहे.
स्थानिकांची गतिरोधकाची मागणी