সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 03, 2018

चिखलाच्या दलदलीत सापडली ती...

चंद्रपूर - दोन दिवसांपासून तिने अन्नाचा घासही घेतला नव्हता. पाण्यावाचून ती तङफङत होती. चिखलात फसलेल्या या माऊलीला हंबरडा फोडणेही कठिण झाले होते. भुकेमुळे तिची अशक्त होऊन शक्तीही संपली होती.
चिखलात फसलेल्या एका म्हसीचे रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्रि इको-प्रो सदस्य यांनी यशस्वी केले।
होटल trystar मागील उर्जानगर ला जाणाऱ्या रोड़वरिल तुलसीनगर परिसर, येथे सांडपाणी वाहून जाण्यास व्यवस्था नसल्याने पालिकेने कच्ची नाली काढलेली आहे. हे सर्व पाणी जमा होण्यास छोटा गड्डा खोदन्यात आलेला आहे. त्यात पाणी जमा होते आणि तिथेच म्हैस फसली माती जास्तच चीकट असल्याने तिला निघता आले नाही, सर्व प्रयत्न करून थकाली, दोन दिवस चारा पाणी नाही, आणि उन्ह यामुळे शरीर प्रयत्न करने सोडले होते.
काल रात्री फेसबुक सोशल मीडियावर 09:00 वाजता दरम्यान श्रीराम पान्हेंरकर यांनी टाकलेली पोस्ट, इको-प्रो सदस्यांनी 10:00 च्या दरम्यान बघितली. लगेच इको-प्रो च्या व्हाटसअप ग्रुप वर पोस्ट टाकण्यात आली जाते. माहिती मिळताच स्थानिक सदस्य घटनास्थळी गेलेत. संस्था अध्यक्ष बंडू धोतरे यांनीही
म्हशीला वाचविण्यासाठी निर्णय घेतला. सुमित कोहले इतर सदस्य यांना कॉल करून बोलावतो,
ग्रुप वर माहिती मिळताच सर्व सदस्य आपल्या 'नगर संरक्षक दल' यूनिफार्म मधे घटनास्थळी रवाना होतात.
इको-प्रो वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर रेस्क्यू ची आवश्यक साहित्य कार्यालयतून घेऊन पोहचतात.
आणि 11:30 pm ला चिखलात फसलेल्या म्हशीची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु होतात. सर्वत्र अंधार, परिस्थिति सोबत नसतानासुद्धा हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. इको-प्रो वन्यजीव विभाग प्रमुख नितिन बुरडकर यांचे नेतृत्वात स्थानिक सदस्य सुमित कोहले, आशीष मस्के, सागर कावले, सूरज कावले आणि शहरातून एकत्रित आलेले धर्मेन्द्र लुनावत, अनिल अद्गुरवार, हरीश मेश्राम, आकाश घोड़मारे, निलेश मड़ावी, राजू काहिलकर, अतुल राखूंडे यांनी सहकार्य केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.