समाजऋनातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यालय आवालपूर ता. कोरपना येथील सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय डाहूले गुरुजी यांची नात तथा गडचांदूर नगरीतील प्रसिध्द मेडिकल व्यावसायिक विजुभाऊ डाहूले यांची कन्या कु. आर्या चा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरले व त्यासाठी त्यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहुल व अतिदुर्गम अशा सितागुडा या शाळेतील मुलासोबत साजरा करण्याचा मानस विजुभाऊ यांनी त्यांचे परम बालमित्र व सितागुडा शाळेचे मुख्याध्यापक मोहन वाभीटकर यांचेकडे व्यक्त केला व त्यांचा या हेतूला मूर्त रूप देण्याचे ठरले.
डाहूले परिवाराने आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सहपरिवार सीतागुडा शाळेत येऊन शालेय मुलासोबत मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा केला व सितागुडा शाळेतील मुलांना शालेय दप्तर, नोटबुक व शालेय उपयोगी साहित्य कु. आर्या हिचे हस्ते वितरित करून अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व सामाजिक दृष्ट्या वंचित मुलांच्या मनात आनंदाचा क्षण आणला. सदर कार्यक्रमाला शा. व्य. स. सितागुडा चे अध्यक्ष तथा सर्व सदस्य, पालकवर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मा. चंद्रकांत पांडे,प्रमोद गावंडे,मा.खुशाल वानखेडे , स.शिक्षक संतोष जुलमे , सौ. वाभीटकर उपस्थित होते. डाहूले परिवार व त्यांच्या कार्याला तसेच कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न करणारे मोहन वाभीटकर व संतोष जुलमे मोलाचे कार्य केले.