चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर पोलीस अधीक्षक कार्यालयात आंतरराज्य पोलीस समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याच्या सीमेवर विशेष लक्ष दिले जाईल तसेच नक्षली हिंसेला आऴा घालण्याकरीता छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने या राज्यातील सीमेवरील जिल्ह्ये नक्षल प्रभावीत असल्याने नक्षल गतिविधीबाबत चर्चा करत एकमेकांना सहकार्य करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत आसिफाबाद (तेलंगाना) यांनी आपआपल्या जिल्हयाची भौगोलिक, राजकीय, सामाजिक,सिमावर्ती भागातील पोलीस स्टेशन, पोलीस चौक्या, आंतरराज्य तसेच राज्य महामार्गाची माहिती, नदया, जोडणारे पुल, रेल्वे मार्ग , दळणवळणाची साधने, आंतरराज्य गुन्हेगार टोळया व त्यांची कार्य पध्दतीची माहिती याबाबत सादरीकरणाद्वारे बैठकीमध्ये माहितीचे आदान प्रदान केले. तसेच घरफोडी, जबरी चोरी, दरोडा करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती व त्यांची कार्यपध्दती, हरविलेले इसम, अनोळखी मृतक, अंमली पदार्थ तस्करी याबाबतची सुध्दा माहिती एकमेकाना आदान व्हावी तसेच चंद्रपूर जिल्हयात १ एप्रील २०१५ पासुन महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी केलेली असुन तेलंगाना राज्यातील सिमावर्ती भागातुन दारूची तस्करी करणाऱ्या इसमांवर कार्यवाही करून प्रतिबंध करण्याकरीता एकमेकांशी समन्वय व संपर्क साधून नाकाबंदी लावण्याबाबत तसेच सर्व प्रकारचे तपास कामात एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून सर्व प्रकारची मदत करण्याबाबत एकमत झाले.कारवाया बाबतची माहिती संकलीत करून एकमेकांना आदानप्रदान करण्याबाबत तसेच सिमावर्ती भागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहुन योग्य समन्वय ठेवण्याबाबत मा. विषेश पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर यांनी उपस्थित दोन्ही राज्याच्या सिमावर्ती पोलीस अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले.
दिनांक 30/10/2018 रोजी मा. श्री. के. एम. एम. प्रसन्ना, विषेश पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र नागपूर यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथील मंथन हॉल मध्ये आंतरराज्य समन्वय बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व तेलंगाना राज्यातील आदिलाबाद, आसिफाबाद जिल्हयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे प्रामुख्याने हजर होते.
सदर बैठकीला डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. एम. व्ही. इंगवले पोलीस उपअधिक्षक (गृह) चंद्रपूर, श्री. सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, श्री. प्रताप डी. पवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, श्री.प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हुपरी, डॉ श्री. विशाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, श्री. शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, श्री.
विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर, श्री. अमोल मांडव परीविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक चंद्रपूर,तसेच तेंलगांना राज्यातील श्री. विश्णु एस. वारीयर पोलीस अधीक्षक आदिलाबाद,श्री. मल्ला रेड्डी पोलीस अधीक्षक, आसिफाबाद ,श्री. एन. व्यंकटेश उपविभागीय पोलीस अधिकारी उटनुर जि. आदिलाबद ,श्री. सी. एच.हान्क पोलीस निरीक्षक, पो. स्टे. नारनुर , श्री. व्ही. वेनुगोपाल राव, मंडळ पोलीस निरीक्षक,
वांकडी (आसिफाबाद वांकडी), श्री. सुभाराव,पोलीस उपनिरीक्षक पो. स्टे. गटटीगुडा (आदिलाबाद) हे प्रामुख्याने हजर होते.