मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूर च्या शासकीय रुग्णालयात चार महिन्यात एकूण 125 हून अधिक नवजात बालकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. सरकारी दवाखान्यातील मृत्यूच्या सरासरी पेक्षा हि आकडेवारी जास्त असल्यामुळे सरकारी दवाखान्यातील भोंगळ कारभाराचा विषय चव्हाट्यावर आला होता. त्यातच भर म्हणून की काय एक धक्कादायक बाब समोर आली असून *दसऱ्याच्या दिवशी तब्बल सहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे घटना उघडकीस आली आहे. या गंभीर विषयासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना घेराव करण्यात आला.
चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून या महाविद्यालयामुळे उच्चशिक्षित व आधुनिक तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा होती परंतु रूग्णालयातील भोंगळ कारभारामुळे व बालमृत्यू सारख्या गंभीर गैर प्रकारामुळे सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षांचा भंग झालेला आहे. या रूग्णालयात जवाबदारी असलेल्या अनेक डॉक्टरांचे स्वतःचे शहरात दवाखाने असल्याने येथील सेवेत दुर्लक्ष करून स्वतः च्या दवाखान्यातील रूग्णांकडे जास्त वेळ व लक्ष देतात यामुळे सुध्दा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल गंभीर आहे.
व म्हणून आजारी झालेल्या रूग्णालयाच्या स्थितीकडे तातडीने लक्ष देण्यासह बालमृत्यू ला जवाबदार असणार्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना घेराव केला.
सदर शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शिक्षक सेलचे शहर अध्यक्ष निमेश मानकर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, मागासवर्गीय सेलचे शहर अध्यक्ष महेंद्र लोखंडे, रा.वि.का.शहर अध्यक्ष सुजित उपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप रत्नपारखी, जिल्हा सरचिटणीस संजय ठाकूर, प्रतिक भगत, जेष्ठ पदाधिकारी किसनराव झाडे, युवा नेते राहूल आवळे व सिंहल नगराळे, पवन बंडिवार, प्रफुल कूचनकर, संजय रामटेके, बिट्टू ढोरके, आशु मत्ते, राहूल भगत सह पदाधिकारी उपस्थित होते..