मूल/प्रतिनिधी:
सध्यास्थितीत धान या शेतमाला चा कापणी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना पैशाची गरज व घरी शेतमाल साठवणुकी करीता पुरेशा जागेच्या अभाव यामुळे त्यांना मिळेल त्या भावात माल विक्री करावे लागत आहे. नवीन शेतमाल निघण्याच्या आणि विक्रीचा हंगाम सुरू झाले आहे. येथील बाजार समिती मध्ये नवीन शेतमालाची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्या करीता मूल क्रुषि उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आपला शेतमाल तारण ठेवून एकुण किमतीच्या 75 टक्के पर्यंतची रक्कम नाममात्र व्याजदरावर कर्ज रुपात दिली जाते. बाजार समिती आवारात शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकरी तारण योजनेत उचल केलेल्या कर्जाचा भरणा करून आपला माल विक्री करू शकतो. या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थीक अडचण दूर होऊन त्यांना त्यांचा शेतमालाच्या योग्य मोबदला मिळेल. तारण योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वर्षाचा पीक पेरा उल्लेख असलेला सातबारा,आधार कार्डची,बँकखाते पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स,100 रुपयाचे स्टम्प पेपर आदी कागदपत्रांसह कर्ज मागणी प्रस्ताव बाजार समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी आपला उत्पादीत शेतमाल इतरत्र कुठेही न विकता बाजार समिती आवारात विक्री करीता आणावा असे आवाहन घनश्याम येनुरकर यांनी केले.