সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 18, 2018

28 आणि 29 ऑक्‍टोबर बेरोजगारांसाठी महामेळाव्‍याचे आयोजन

21 ते 25 ऑक्टोबर या काळात ऑनलाईन नोंदणी अनिवार्य 

50 ख्यातनाम कंपन्यांकडून शेकडोंची जागेवरच होणार निवड 
चंद्रपूर जिल्‍हयातील सुशिक्षीत बेरोजगारांनी लाभ घेण्‍याचे आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image may contain: 1 person, smiling
 राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्‍पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्‍याचे आयोजन बल्‍लारपूर तालुक्‍यातील बामणी येथे करण्‍यात आले आहे. पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डिजीटल सर्टिफिकेट, जागेवरच अपाँईंटमेट लेटर आणि प्लेसमेंट प्रक्रीया पूर्ण केल्या जाईल. त्यामुळे या मेळाव्याच्या आयोजनाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्याने, विभागाने व आयोजकांनी पाळावी, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा, मुद्रा कर्ज उपलब्धता, याशिवाय 50 प्रतिष्ठीत कंपन्याकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे. या मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे 21 पासून सुरू होणाऱ्या या नोंदणी प्रक्रीयेवर तरुणांना लक्ष केंद्रीत करायला सांगा. ज्याच्यात प्रावीण्य असेल, कौशल्य असेल, गुणवत्ता असेल अशी तुमच्या व माझ्या जिल्हयातीलच मुलांची निवड होणार आहे. आपला जिल्हा रोजगार युक्त व्हावा, ही भावना ठेऊन यामध्ये सहभागी व्हा, आपल्या गावातील, तालुक्यातील, गटातील मुलांना मोठया कंपन्यांचे आकर्षक पॅकेज मिळावे. मुंबई, पुणे याप्रमाणे संधी मिळावी यासाठी कंपन्याच आपण हजार किलोमिटर अंतरावरील बल्लारपूरला आणल्या आहेत. या ठिकाणी फक्त नोकरीच भेटणार नसून ख्यातीप्राप्त मार्गदर्शक रोजगार, स्वयंरोजगार व अन्य क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी मदत करणार आहे, जिल्हयाच्या कायम स्मरणात राहील असा हा मेळावा असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊडेशनचे अध्यक्ष आमदार अनील सोले यांनी या मेळाव्यातून आपल्या मुलाला, नातेवाईकाला नोकरी लावायची नसून या जिल्ह्यातल्या हजारो युवकांना नोकरी देण्यासाठी हे आयोजन आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे व त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी येत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आपला आयुष्य घडविण्याची संधी आम्हा सर्वांना या आयोजनातून मिळणार आहे हे लक्षात घ्या, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी काही समित्यांचे गठन करण्यात आले. 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन यावेळी आमदार सोले यांनी केले. आमदार सोले यांच्या नेतृत्वातील फॉर्च्यून फाउंडेशन हे या मेळाव्याच्या आयोजकांतर्फे एक आहे. याशिवाय जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, जिल्हा समन्वय समिती, चंद्रपूर यांच्‍या वतीने हे आयोजन करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हा रोजगारयुक्‍त बनविण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्‍नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्‍पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.

इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर, अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com /register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. दिनांक 21 च्या सकाळी 10 वाजतापासून ते 25 ऑक्‍टोबरच्या सायं.6 वाजेपर्यंत 5 दिवस ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.