चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ९ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले व ५०० मेगावाट संच क्रमांक ८ येथे मॉक ड्रील प्रात्याक्षिके घेण्यात आली. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन प्रात्याक्षिके घेण्यात आली तसेच चेम्ररी प्रशिक्षण केंद्र येथे मानवी जीव वाचविण्याचे कौशल्य या संदर्भात इंडियन सोसायटी फॉर अॅनेस्थॉलॉजी चंद्रपूर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे होते. त्यांनी सप्ताह निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व यथोचित मार्गदर्शन केले व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र वितरीत केले.
याप्रसंगी उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, राजेशकुमार ओसवाल, अधीक्षक अभियंते सुहास जाधव, अनिल पुनसे, अनिल गंधे, कार्यकारी अभियंते शालिक खडतकर, बाळू इंगळे, शिवशंकर पडोळे, इंदल चव्हाण, सराग, अजय बगाडे, सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, अभियंता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरक्षितता अधिकारी चव्हाण व आभार प्रदर्शन प्रशांत कठाळे यांनी केले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विद्युत विभाग, सुरक्षा विभाग, प्रशिक्षण विभाग व अग्निशमन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले