कारंजा (घा. ) गुरुकुल पब्लीक स्कूल शाळेने यंदाही १० वीच्या निकालात १००% निकालाची परंपरा या वर्षीसुदधा कायम ठेवली. या शाळेमधून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मध्ये एकूण ३३ विद्यार्थी परिक्षेला बसलेले होते. यात बसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे .यांपैकी ९० % च्यावर १४ विदयार्थी ,८० % च्या वर १० विदयार्थी, ७० % च्यावर ९ विदयार्थी उत्तीर्ण होवून कारंजा तालुक्यात गुरुकुल कॉन्व्हेंटने गुणवत्तेची परंपरा कायम राखली.सदर शाळेतून कु. वैदेही उत्तमराव बोबडे ९०% व कु. पल्लवी लिलाधर लायबर ९५.४०%,पियुष मुरलीधर बोडखे ९२.६०% , आशुतोष शैलेश धिमे ९२.४०%,साक्षी हरिशचंद्र हिंगवे ९२.४०% सेजल भोजराज रमधम ९१.८०%, तनिषा चुन्नीलाल गौरखेडे ९१.६०% , आशिष सुनील मानमोडे ९१.४० % अनिरुध्द भारत ढवळे ९१.२०%, रिमा युवराज किनकर ९०.८०% ,अन्सरा इकबाल शेख ९०.८०%, साक्षी प्रफुल ठाकरे ९०.६०%,सिध्दी चरणदास काळे ९०.४०%,चेतन संजयराव नासरे ९०% हे सर्व विदयार्थी ९० % च्या वर टक्केवारी प्राप्त करुन तालुक्यात त्यांनी शाळेचे नावलौकिक केले.
या सर्व यशस्वी विदयार्थ्याचे संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी या सर्वानी अभिनंदन केले.