महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१८ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला यात चंद्रपुर जिल्ह्यातून कु. पायल प्रकाश बनकर हीने मराठी विभागातून जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकवीला आहे.तिला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल चंद्रपूर तेली युवक मंडळ बाबुपेठच्या वतीने पायलच्या घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी विश्वास इटनकर,उमंग हिवरे,रोशन गिरडकर,प्रतिक हरने,आशीष वैरागडे आदी युवक उपस्थित होते.
खर म्हणजे ज्या वयात मुलांना आई वडिलाचे प्रेम व पाठिंब्याची गरज असते अश्याच वेळी नेमके वडिलाचे छत्र हरविलेल्या पायलने प्रतीकुल परीस्थितीवर मात करत आई,ताई, व शिक्षकांच्या मदतीने मराठी विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे.या परीक्षेत तिला ९६.२० टक्के गुण मिळाले आहे. पायल बनकर ही जोड़देऊळ पठानपुरा वार्ड चंद्रपुर येथील रहिवासी असून ती लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपुर या शाळेची विध्यार्थिनी होती,विशेष म्हणजे घरची परिस्थिती हलाखीची त्यातच मुलींचे शिक्षण व यावर होणारा खर्च लक्षात घेता महागळ्या गुरुकील्ल्या ती विकत घेऊ शकली नाही व संपूर्ण अभ्यास हा शाळेतील पुस्तक व शाळेतील शिक्षकांच्या मदतीने व घरी आई,ताई व नातेवाईकांच्या मदतीने पूर्ण केला, अश्या प्रकारे परिस्थितीवर मात करून पायलने इतरांपुढे आदर्श ठेवत समाजात नाव उंचावले आहे.या परिस्थितीत तिला मिळालेल्या यशाबद्दल तेली युवक मंडळ बाबुपेठच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.पायाल ही अतिशय हुशार असून तिला पुढील शिक्षण घेऊन IAS बनायचे आहे.