সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 04, 2018

चैतन्य धानोरकर याने निर्माण केले नव चैतन्य :डाॅ.शामसुंदर लद्धड

गुणवंत विद्यार्थांनसह पालकांचाही सस्नेह सत्कार
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:

येथील लाखोटीया-भुतडा -सी बी एस ई हायस्कूल च्या प्रथम तुकडी( फस्ट बैच)चा निकाल100टक्के लागला. ग्रामिण आदिवासी बाहूल भागातील लाखोटीया भुतडा सी बी एस ई हायस्कुल सुरूवातीस अनेक अडथळे पार करत या शाळेच्या सी बी एस ई शाखेला शासन मान्यता मिळाली, या हायस्कुल ची सी बी एस ई ची दहावी ची ही पहिलिच बैच (तुकडी)आहे. शाळेचा निकाल 100टक्के लागला. या प्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळा कडून 03जून रोजी हायस्कुलच्या च सभागृहात सकाळी साडे नव वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांचे पालका सह सस्नेह सत्कार सोहळ्याचे आयोजन करन्यात आले होते. या हायस्कुल तर्फे 20विद्यार्थि सी बी एस ई दहावी चे परिक्षेला बसले होते, यात चैतन्य विलासराव धानोरकर94%,सांख्यकि संजयराव ठवळे88%,खुषी गोपाल धिरण86%,प्राजक्ता साहेबराव ढोले83%,गौरव नामदेवराव गोरले82%व साक्षि पांडूरंग सरोदे81% टक्के प्रविण्य यादित तर अकरा विद्यार्थि, प्रथम श्रेणी आणि तिन विद्यार्थि द्वतिय श्रेणी गुणांकात उत्तिर्ण झाले ,यात प्राविण्य गुणांकातिल विद्यार्थी व त्यांचे पालकां चाही सत्कार करन्यात आला, या प्रसंगी सर्व प्राविन्यप्राप्त विद्यार्थ्यां नी आपल्या या शालेय जीवनातील आठवणिंना ऊजाळा देत शिक्षक व पालकांच्या सहकार्याची माहिती दिली. त्याच प्रमाणे पालक विलासराव धानोरकर , डाॅ. संजय ठवळे यांनी ही ला भु सी बी एस ई चे सर्व शिक्षक, व्यवस्थापक मंडळाचे आभार मानले, हायस्कुल च्या प्राचार्य ज्योती राऊत यांनी प्रास्ताविकेत सी बी एस ई शाळेची माहिती सांगितली, या प्रसंगी प्रा. सुनिल सोलव , सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, प्रा. निकिता गुप्ता, प्रा. सुभाष राठी, यांनी ही हायस्कूल चे प्रथम तुकडी च्या शंभर टक्के निकाल व हायस्कुल चे अनेक विद्यार्थ्यांना हिंदी, गणित , विज्ञाण,इंग्रजी विषयात वैयक्तित 94ते97%गुणांक प्राप्त करनार्या विद्यार्थ्यांचे ही सत्कार करन्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी सत्कार सोहळ्या चे कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी होते, संस्थे चे सचीव डाॅक्टर शाम सुंदर लद्धड यांनी आपले मार्गदर्शनात सांगितले की या हायस्कुल च्या दहावी च्या पहिल्या बैच ला प्रथम आलेल्या चैतन्य धानोरकर यांने आज या शाळेत नव चैतन्य निर्माण केले आहे हे या शाळा व संस्थे साठी अभिमानाची बाब आहे,तसेच या शाळे साठी लवकरच प्रशस्त क्रिडांगण, भव्य स्टेज , सुरक्षा भिंत बनविन्या येत असुन, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, कला तसेच सी बी एस ई शिक्षणाला लागनार्या सर्व सोई सवलती उपलब्ध आहेत, संस्थेचे उपध्यक्ष सोमराज पालिवाल, ला. भु. कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य दामोदर कुहिटे,प्राचार्य ज्योती राऊत यांचे उपस्थितित व सी बीएस ई हायस्कुलच्या दहावी वर्गाच्या पहिल्या तुकडित शिक्षण घेणार सर्व विद्यार्थ्यी व त्यांचे पालक ही या प्रसंगी हाजर होते. या परिक्षेत 94%टक्के गुणांक मिळविणारा चैतन्य धानोरकर यांनी या प्रसंगी आपले आजी व आजोबां ना विषेश करून सोबत आनले होते व आपले मनोगत व्यक्त करतांना आई -वडिल व गुरूजनां सोबत आजी -आजोबांचे विषेश आभार मानून त्यांनी केलेल्या सहयोगाची माहिती ही दिली, कार्यक्रमाचे संचलन प्रा. योगेश चौधरी तर आभार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सी बी एस ई हायस्कुल चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व पालकवर्ग हाजर होते तर आभार ज्योत्स्ना कडवे यांनी व्यक्त केले.

 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.