भद्रावती/वरोरा
(शिरीष उगे) :
भद्रावती तालुक्यातील ढोरवासा खदान जवळील वर्धा नदीच्या
घाटावर एवध रित्या मोटार सायकल ने वाहतूक करीत असताना पोलिसांनी वाहन
ताब्यात घेतले मात्र यातील आरोपी फरार झाले ही कारवाही दि ६ ला पहाटे च्या
सुमारास करण्यात आली. यामध्ये मोपेड गाडी एम. एच. ३४. ए. झेड. २४४८ व एम. एच. ३४. ए. झेड. ३५५८ या वाहनांचा पाठलाग केला असता आरोपीने दोन्ही वाहन सोडून फरार
झाले होते. या गाडी मध्ये दोन लाख किमतीचे देशी दारू आणि दोन दुचाकी असा
तीन लाखांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई भद्रावती ठाणेदार बी डी मडावी
यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आलांडे, सुनील ढवस,
सचिन गुरनुले, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान यांनी कारवाई केली.