সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 03, 2018

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे देहावसान

नागपूर -गेल्या महिन्याभरापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे एचएमटी भात वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे सर्च हॉस्पिटल (जि़ गडचिरोली) येथे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते़ त्यांच्यावर सोमवारी दुपारी मूळ गाव नांदेड (ता़ नागभीड) येथे अंत्यसंस्कार होईल.


अल्पभूधारक असलेल्या दादाजींनी १९८३मध्ये भाताचे वाण शोधण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी एचएमटी या बारिक आणि चवदार अशा भात वाणाचा शोध लावला़ त्यानंतर त्यांनी धानावर प्रयोग करीत विविध वाण विकसित केलेत़ या कार्याबद्दल त्यांना अनेक राज्यशासन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. दादाजींनी ‘विजय नांदेड’, ‘नांदेड ९२’, ‘नांदेड हिरा’, ‘डीआरके’, ‘नांदेड चेन्नूर’, ‘नांदेड दीपक’, ‘काटे एचएमटी’ आणि ‘सुगंधी’ हे नऊ वाण विकसित केले आहेत. या कामासाठी दादाजींना १२ पुरस्कार मिळाले असून, राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला. मध्य प्रदेशातील इंदूर येथील संस्थेतर्फे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते दादाजींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ २०१० मध्ये फोर्ब्ज मासिकातर्फे प्रकाशित जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांचे नाव होते़ मागील महिन्यापासून त्यांची प्रकृती बिघडली होती़ त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात पक्षाघाताचे उपचार सुरू होते़ त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मंजूर केले़ पुढील उपचारासाठी शनिवारी प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सर्च हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते़ रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालावली़ त्यांच्यामागे मुलगा मित्रजित, सून इंदिरा, नातू मनीष, विजय, दीपक असा परिवार आहे़

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.