कर्तव्यावर असतांना आपल्या जिवाची पर्वा न करता एका महिलेची अत्याचार करणाऱ्या इसमाच्या तावडीतुन सुटका करून वीरमरण पत्करणाऱ्या पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडुन शहीदाचा दर्जा मिळाला आहे.
०९ जुन १९९६ रोजी पोहवा साधुजी चांदेकर हे आपल्या दुचाकीनेचंद्रपुरकडे जुनोना मार्गे परत येत असतांना त्यांना गिलबीली गावाजवळ एका ट्रक मधुन महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजावरून साधूजी चांदेकर यांनी आपले वाहन थांबुन पाहीले असता त्यांना एक ट्रक चालक चारा शोधन्यासाठी आलेल्या महिलेचा छळ करीत आहे असे दिसले. त्यावरून त्यांनी त्या महिलेची सूटका करण्यास आपल्या जिवाची पर्वा न करता धाव घेवुन तिची त्या ट्रक चालकाचा तावडीतून सुटका केली. आणि सुटकेनंतर तिला सुखरूप तिच्या मार्गावर सोडले. या कार्यवाही मुळे ट्रक चालक संतापला आणि साधुजी चांदेकर यांना ते आपल्या दुचाकीने जात असतांना त्यांना जोरदार धडक मारल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. या त्यांच्या विरमरणाला आज राज्य आणि केंद्र शासनाने पोलीस हवालदार श्री. साधुजी चांदेकर यांना शहीदाचा दर्जा दिला आहे. सदर कार्यक्रम हा सिध्दार्थ शाळेत आयोजीत करण्यात आला असुन याच शाळेत त्यांचे स्मारक सुद्धा बांधण्यात येणार आहे.