সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, June 05, 2018

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरावा:देवराव भोंगळे

आता एकच लक्ष 13 कोटी वृक्ष
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्य संयुक्त रॅलीजागर  
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जुलैपासून एक महिना संपूर्ण जिल्हयात वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम राबविण्यात यावा. गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात दुस-या क्रमांकावर होता. यावेळी मात्र 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील. यासाठी नियोजन करु या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज येथे केले.दिनांक 05 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य निसर्ग संवर्धन व पर्यावरण जनजागृती वाढविण्यासाठी तसेच सन 2018 चे पावसाळयात 01 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये वृक्ष लागवडीबाबत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार व्हावा याकरीता भव्य संयुक्त रॅलीचे वनविभागाच्या वतीने आयोजन करण्यांत आले.

रॅली महानगरपालीकेचे पटांगण, गांधी चौक येथुन निघून जटपूरा गेट-बस स्टॅण्ड मार्गे रामबाग वनवसाहत येथे संपन्न करण्यांत आली. महापौर अंजलीताई घोटेकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य मुकूल त्रिवेदी, जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांचेहस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात करण्यांत आली. रॅलीमध्ये वनविभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, महानगरपालिका, राजस्व विभाग, पोलीस विभाग, कारागृह विभाग, महावितरण, इत्यादी इतर प्रशासकीय यंत्रणा, अशासकिय संस्था, प्रामुख्याने ईको-प्रो, हरित चळवळ इत्यादींनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. रॅलीची सांगता रामबाग कॉलनी येथे करून उपस्थितांना पर्यावरण, वृक्ष लागवडीबाबत व प्लॅस्टीकच्या बंदीबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले.
पूर्वी बहुउद्देशिय संस्था, पोंभुर्णा यांनी कलापथकाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष लागवडबाबत लोकांना संदेश दिला. तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, महानगरपालिका, चंद्रपूर येथील शिक्षक उमेश आत्राम यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वृक्ष लागवड व वन्यजीव संरक्षणाबाबत कलेचे सादरीकरणद्वारे जनजागृती करण्यांत आली.
पर्यावरण दिनाचे औचित्त्याने दिनांक 14 मे 2018 रोजी चंद्रपूर जवळच्या जंगलात ‍बिबटला जेरबंद करण्यांत दाखविलेल्या धैर्याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे चंद्रपूर यांचे महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी तसेच कार्यक्रमस्थळी मा. श्री. देवरावजी भोंगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर व कर्मचारी यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रामुख्याने श्री. बडकेलवार, समन्वयक अधिकारी, 50 कोटी वृक्ष लागवड, श्री. ब्राम्हणे, श्री. करे, श्री. धोतरे,‍ विभागीय वन अधिकारी व वनविभागाचे, ईतर विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपन करण्यांत आले.कार्यक्रमाचे संचालन श्री. शेंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संतोष थिपे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे.), चंद्रपूर यांनी केले.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.