সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, January 08, 2018

अन वाघोबा घेऊन पळाला मजुराचा घमेला

चंद्रपूर/प्रतिनिधी:   
आधी जेवणाचा डब्बा आणि मग मजुरांचा घमेला, हि  गोष्ट आहे जगभरात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा वाघ्र प्रकल्पातली, या अभयारण्यात सध्या वाघ हा शिकारीसोबत अन्य उपद्रव कामे सुद्धा करू लागला आहे, चक्क जंगलाचा राजाने जंगलात काम करणाऱ्या मजुराचा मजुरीच्या कामाचा घमेला घेऊन पडकाढल्याचे चित्र ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना बघायला मिळाले आहे.  
   
वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर येथील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास चिमूर तालुक्यात यात असलेल्या नवेगाव गेटच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्यासाठी प्लास्टिक फायबरचे टोपले ठेवले होते. वाघ देखील त्याच परिसरात बसलेला होता.  अचानक  या वाघाने झुडपातून निघून चक्क टोपले तोंडात घेऊन पळ काढला. हा संपूर्ण प्रकार हा तेथिल पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला व तो सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला,  देश-विदेशातील पर्यटक वाघाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे.  

ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याने वाघाच्या वावरासाठी जंगल कमी पडू लागल्याचे वन्यजीव प्रेमींकडून ओरड केली जात आहे, वाघ जास्त असल्याने कुठल्या ना कुठल्या स्थळी वाघ पर्यटकांना दिसत आहे. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरू आहे, या कामावर गिट्टी मुरूम पसरवण्यासाठी मजूर काम करीत होते त्याच वेळेला हा संपूर्ण आश्चर्यकारक प्रकार घडला 

असाच काहीसा प्रकार महिनाभर पहिले मोहुर्ली परिसरात घडला होता, तेव्हा वाघाने तेथे ठेवलेल्या मजुराच्या  जेवणाच्या डब्यावर ताव मारला होता , तेव्हा या वाघाने जेवनाचे टिफीन तोंडात घेवून झुडपात निघून गेला होता.परत वाघाने दुसऱ्यांदा मजुरांचा घमेला पडविल्याचा प्रकार केल्याने जगभरात चर्चेचा विषय बनला आहे, या संपूर्ण प्रकारामुळे मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र या घटनेपासून पर्यटक अत्यंत आनंदी आहेत.याच कारणाने ताडोबात पर्यटकांचा कल वाढत चाललेला दिसत आहे  .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.