সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, January 12, 2018

राजेश बेले बसणार आमरण उपोषणावर

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष राजेश बेले येत्या १७ जानेवारी असून आमरण उपोषणावर बसणार आहे .  
राजेश बेले यांनी शांतीधाम स्मशानभूमीच्या नदीघाटावर निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरूअसल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून माहिती अधिकारी मागितली होती व समशानभूमीला लागून असेल्या नदीपात्रात मागील  एक ते दीड वर्षापासून बांधकाम सुरूआहे. त्या कामासाठी मनपाच्या इलेक्ट्रिक मीटर मधून वीज घेऊन लाखोरुपयाची वीज चोरी करत असल्याची माहिती उजेडात आली होती. हि बाब राजेश बेले यांनी माध्यमातून समोर आणल्याने या कामाचा ठेका घेणारे नगरसेवक राजीव गोलीवार यांचेकडून बेले यांना फोनवरून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा अनेकदा वापर करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे, या धमकीची तक्रार बेले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी गोलीवार यांचेवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून यांचेवर कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे . 
सोबतच गोलीवार यांचेवर चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी देखील राजेश बेले यांनी पत्रपरिषदेतून केली आहे .  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.