१९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास
नागपूर/प्रतिनिधी: एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी लुटारूंनी या एटीएममधून १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.