সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 10, 2018

जनावरे घेऊन जाणारा ट्रक ;रामटेक पोलीसांकडून जप्त

08 जनावरांचा ट्रक मध्ये गुदमरून मृत्यू , 55 जनावरांची देवलापारच्या  गौशाळेत  रवानगी
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक पोलीसांनी संशय आल्याने पाठलाग करून दोन ट्रक  रामटेकच्या कीट्स अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ अडवून ताब्यात घेतले.या दोन्ही टंकमध्ये अवैधपणे अत्यंत क्रूरतेने 63 जनावरांची वाहतूक केली जात होती.या घटनेत रामटेक पोलीसांनी 63 जनावरांपैकी 55 जिवंत जनावरांना देवलापारच्या गौशाळेत पाठविले असून आठ जनावरे मात्र ट्रकमध्येच गुदमरून मेली.रामटेक पोलीसांनी याप्रकरणी दोन्ही ट्रकचालकांना अटक केली असून दोन टंक व जनावरे असा एकूण 25 लक्ष  50 हजार रूप्यांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई केल्याचे रामटेकचे पोलीस  निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगीतले. 
पारधी यांनी यांगीतले की रामटेक पोलसांना दिनांक 10 जानेवारी  2017 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गुप्त माहीती मीळाली होती. की  दोन ट्रक अवैधपणे सर्व नियमांना डावलून जनावरांची वाहतूक करीत आहेत.

त्यानुसार पोनी योगेश पारधी,                 हेड कॉन्स्टेबल    बडवाईक,नापोशी सुरेश धुर्वे, पोशी  गोविंद खांडेकर,मेडेकर,आशिक कुमरे,चालक पोहवा कमलाकर ठेंगरी यांनी नाकाबंदी करीत टंकची वाट पाहात बसले होते.त्यांना ट्रक क्रमांक युपी 50/पी 3514 आणी सीजी04/जेबी 3945 हे जातांना  दिसले.या वाहनांना थांबण्याचा ईशारा देण्यात आला मात्र त्यांनी आपली वाहने न थांबवता अधिक जोराने पळविण्यास सुरूवात केली.यावरून पोलीसांचा संशय अधिकच बळावला व त्यांनी या वाहनांचा पाठलाग सुरू केला.रामटेक बायपास रोडवरून या वाहनांनी कीट्स अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपली वाहने वळविली मात्र थोडयाच अंतरावर पोलीसांनी त्यांना पुढे जाण्याची अवस्था नसल्याची स्थिती निर्माण  केली.ही परीस्थिती लक्षात येताच सी. जी 04/जेबी 3945 च्या चालकाने चालत्या टंकमधून उडी मारली व पळून जाण्याचा प्रयत्न केला.या भानगडीत  ट्रक उजव्या बाजुला रस्त्यालगतच्या झाडाजवळ जावून थांबला.मागे दुसरा ट्रक पोलीसांनी अडविला होता.हे दोन्ही ट्रक पुर्णपणे ताडपत्रीने आच्छादीत होते व यात ट्रक क्रमांक युपी50/पी 3514 मध्ये एकूण31जनावरे कोंबून भरलेली होती.यात 18 गायी,12 बैल व 1 जनावर मृतावस्थेत मीळाले. दुसरा टंक क्रमांक सीजी04/जेबी3945 यामध्ये 22 गायी,3बैल व 7 जनावरे मृतावस्थेत आढळून आली.या दोन्ही ट्रकसह जनावरांना ताब्यात  घेतल्यानंतर जनावरांना देवलापारच्या गौशाळेत पाठविण्यांत आले आहे.प्रत्येकी दहा लक्ष रूप्ये कीमतीचे दोन टंक व जनावरांची किंमत असा एकूण 25 लक्ष 50 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करण्यात यष मीळविले  मात्र आठ जनावरांचा या घटनेत जीव गेला.नदिम नषिम खान वय 20  वर्षे  ,राहणार सिवनी,मध्यप्रदेश  व यासीम ईस्तियार खान वय 40 वर्षे राहणार कटंगी मध्यप्रदेश याचेंविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात  आले असून हे ट्रक मध्यप्रदेशातील लखनादोन वरून नागपुरकडे जात होते. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.