সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 11, 2018

“महा मेट्रो : विविध ठिकाणी युद्धस्तरावर कार्य”

 नागपूर ११ :  मुसळधार पावसाने नागपुरातील काही भागात पाणी तुबले असतांना महा मेट्रो, नागपूर द्वारे या संदर्भात तातडीच्या उपयोजना सुरु केल्या आहे. तुबलेल्यां भागातून पाणी बाहेर काढणे, खचलेल्या रस्त्याचे दुरुस्तीकरण करणे, माती खसली असेल तिथे मुरूम टाकणे आणि रस्त्याची डागडुजी करण्याचे असे महत्वाचे कार्य मेट्रो प्रशासनातर्फे सुरु करण्यात आले आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणीवर मात करण्यासंबंधीचे उपाय जोमात सुरु असतांना दुसरीकडे अशी परिस्थिती परत उतभवू नये या करिता उपाय योजना केल्या जात आहे. महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आज कार्यस्थळी भेट देऊन कार्य बद्दल माहिती जाणून घेत स्थिती पूर्ववत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व पिडीत नागरिकांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.

 गेल्या ४८ तासात नागपूर येथे कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला होता. शहरातील काही भागातील सखुल वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते यात वर्धा रोड वरील सोमलवाडा व मनीष नगर परिसरातील काही रहिवासी तसेच वान्य्जिक इमारतीचा समावेश आहे. तसेच विमानतळ येथील रस्त्यावर माती खचल्याने भेग पडली होती. घटनेची माहिती मिळताच मेट्रो प्रशासनाने तडका फडकी आपले अधिकारी कर्मचारी आणि क्यूआरटी चमू तसेच सुरक्षा पथकातील कर्मचार्यांना घटनास्थळी रवाना केले व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.  रस्ता खचल्याने तेथील वाहतूक वळविण्यात आली या दरम्यान सुधार कार्य करून सुमारे दोन तासाच्या कामानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तसेच सोमलवाडा आणि मनीष नगर परिसरातील ज्या रहिवासी, वान्य्जिक इमारती मध्ये पाणी घुसले होते तेथून ते काढण्याचे काम सुरु करण्यात आले. सोमलवाडा येथील उदयन या निवासी संकुलात साचलेले पाणी तसेच नजीक जवळच्या साखरकर यांच्या किराणा दुकानात साचलेले पाणी काढण्यात आले. या भागातील तुबलेल्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी या करता दोन पंपाची सोय करण्यात आली आहे. तसेच जेसीबी च्या साह्याने उदयन निवासी संकुल व त्या भागात पाणी साचू नये म्हणून त्याकरता नाली खोदकामाचे काम सुरु झाले आहे. 

सोमलवाडा तसेच मनीषनगर परिसरातील ज्या भागामध्ये पावसामुळे जमीन खचली त्या भागांमध्ये माती व मुरूम भरण्यात आले. याच भागातील ज्या घरांमध्ये पाणी साचले होते तेही वॉटरपंप  च्या साह्याने काढण्यात आले. सोमलवाडा येथे बांधकाम होत असलेल्या अंडरपास आणि कालच्या पावसामुळे भूस:खलन झाले त्या ठिकाणी माती भरण्याचे काम होणार आहे. सोमलवाडा परिसरात ट्रासफार्मर पडल्याने खंडित झालेला वीज पुरवठा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पूर्ववत केला असून ट्रासफार्मर उभारून परिस्तिथी पूर्ववत करण्याचे काम देखील मेट्रो तर्फे लगेच सुरु होणार आहे. मनीषनगर भागातील पंचतारा सोसायटी जवळील अनिरुद्ध नोव्हेल्टीज आणि फ्लश बँक स्टुडियो समोरील रस्त्याचे काम देखील सुरु होणार आहे.   

महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कार्यस्थळी भेट देऊन भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये याची दखल घेत कंत्राटदार व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व नागरिकांना झालेल्या त्रासा बद्दल दिलगिरी व्यक्त केली.यावेळी कार्यकारी संचालक(रिच-१)  देवेंद्र रामटेक्कर,  महाव्यवस्थापक(प्रशासन) अनिल कोकाटे व इतर अधिकारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.