সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 11, 2018

मोजणी करुनच अतिक्रमीत रस्ता खुला करणार..

आश्वासना नंतर उपोषण तुर्तास मागे;सरपंचाचीच सभेला दांडी
नांदा/प्रतिनिधी:
नांदा ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रिया राजगडकर त्यांचे प्रभागात नावंधर कुटुंबाव्दारे विनापरवानगी बांधकाम करीत असल्याने व सार्वजनिक रहदारीचा रस्ता खुला करण्याकरिता उपोषण करणार असल्याने उपोषणा अाधीच दखल घेत तहसिलदार कोरपना व गटविकास अधिकारी यांनी आश्बासित केल्याने उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की ,  मागील महिन्याभरापासून ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी नावंधर यांचे विनापरवानगी बांधकामा विरोधात एकाकी लढा सुरु केला होता. सचिवांनी बांधकाम बंद करण्याबाबत नोटीस बजावली असतांनाही नावंधर यांनी नगर रचनाकार यांची परवानगी काढण्या ऐवजी  मुजोरीने बांधकाम सुरुच ठेवले. सत्तापक्षातील काही पदाधिकारीच नावंधर यांची पाठराखण करित असल्याने तक्रारकर्त्या प्रिया राजगडकर यांनी दिनांक ११/६/२०१८ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची नोटीस दिल्याने व वृत्तपत्रातुन प्रकरणात प्रकाश टाकल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना डाॅ. संदिप घोन्सिकर यांनी तात्काळ दखल घेत नांदा ग्रामपंचायतीचे सचिवांना कलम ५३ अन्वये कारवाई करण्याचे आदेशित केले तर कोरपना तहसिलदारांनी लगेच तलाठी नांदा यांना पाठवुन काम बंद करायला लावले. दिनांक ७/६/२०१८ रोजी नायब तहसिलदारांनी बांधकामाचे ठिकाणी भेट दिली. महिला ग्रामपंचायत सदस्य उपोषणास बसणार असल्याने प्रभारी तहसिलदार कौलवकर सरांनी तात्काळ नावंधर यांचे प्लाट मोजणी करण्याचा आदेश केला असुन प्रकरण दाखल करुन न्यायोचित कारवाई करणार आहेत उपोषण मागे घ्यावे असे पत्र तहसिलदार महोदयांनी पाठविल्याने उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांचे आदेशान्वये कलम ५३ नुसार कारवाई करिता व उपोषण मागे घेण्या संमधाने  सरपंच घागरु कोटनाके यांनी  ९/६/२०१८ रोजी सभा बोलावुन स्वत:च सभेला दांडी मारली.  सरपंचावरच दबाव आणल्या जात असल्याची चर्चा आहे.अधिकारी वर्गाने आश्वासित केल्याने उपोषण मागे घेतले आहे. रस्ता  खुला करेपर्यंत मागे हटणार नसल्याचा मानस तक्रारकर्त्या सदस्याचा आहे. प्रशासनाने प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे.
नावंधर यांचे दोन्ही प्लाट अकृषक आहेत. दोन्हींचे नकाशे सचिवांना दिले आहेत. वेगवेगळया दोन सर्वे मधील जागा अाहेत. दोन्ही जागेवर मोठे बांधकाम केले आहेत. सचिवांनी बांधकाम मोजणी करणे गरजेचे आहे सचिव कलम ३८ अन्वये पंचायतच जबाबदार असल्याचे सांगुन स्वत:ची जबाबदारीतून मुक्तता करुन घेत आहे ही बाब गंभीर आहे.
       प्रिया राजगडकर
(सदस्या ग्रामपंचायत नांदा)


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.