महावितरण वर्धापनदिन विशेष
नागपूर/प्रतिनिधी:
विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन तेरा वर्ष पूर्ण झाली. या तेरा वर्षामध्ये महावितरणच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. मार्च 2005 मध्ये राज्यातील ग्राहकांची संख्या 1 कोटी 33 लाख 77 हजार 554 होती, त्यामध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. डिसेंबर 2017 मध्ये एकूण ग्राहकांची संख्या 2 कोटी 54 लाख 17 हजार 134 इतकी झाली आहे. राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत वीजेला अनन्यसाधारण महत्व असून महाराष्ट्राच्या एकूणच औद्योगिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीत मागिल तेरा वर्षात महावितरणने आपले भुमिका योग्यरित्या पार पाडली आहे.
गेल्या तेरा वर्षात ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असली तरी ग्राहकांसाठी विविध योजना देखील राबविण्यात येत आहेत. भारनियमनासारखा प्रश्न निकाली काढणे, वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण, ऑनलाईन वीज जोडण्या, वीज बील भरण्यासाठी विविध योजना, मीटर वाचनासाठी अत्याधुनिक यंत्रणा, ग्रामीण भागात वीज जोडणी देण्यासाठी 'महावितरण आपल्या दारी योजना, औद्योगिक ग्राहकांसाठी विशेष मदत कक्ष, महावितरण मोबाईल ॲप, कृषीपंपाच्या जोडणीमध्ये वाढ, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंपासाठी विशेष पॅकेज, औद्योगिकदृष्ट्या मागास भागातील उद्योगिकरणात वाढ होण्यासाठी वीजबिलात विशेष अनुदान आणि सौभाग्य योजना आदींच्या मध्यमातून प्रलंबित वीज जोडण्यांची यादी संपविल्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीचे अनुकरण लगतची राज्ये करीत आहेत.
गेल्या तेरा वर्षात ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक उपक्रम राबविले. ग्राहकाला योग्य दाबाने चांगल्या गुणवत्तेची वीज देण्याबरोबरच गरजे इतकी वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीजचोरीविरूध्द सातत्याने मोहिमा राबवून 2005 साली 31.72 टक्के असलेली वितरण हानी आता 14 टक्केवर आणण्यात आली आहे. शहरांच्या विस्तारीकरणामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढत होत असून वीज ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रभावी नेतृत्वात मागिल काही वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे महावितरण अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची ग्राकसेवेसोबत सांगड घातल्याने महावितरण आज भारतातील अग्रणी वीज वितरण कंपनी ठरली आहे.
मार्च 2005 मध्ये राज्यात घरगुती ग्राहक 96 लाख 72 हजार 512, वाणिज्यिक ग्राहक 10 लाख 2 हजार 334, औद्योगिक ग्राहक 2 लाख 25 हजार 379, कृषी ग्राहक 22 लाख 86 हजार 250, इतर ग्राहक 1 लाख 91 हजार 79 मिळून एकूण ग्राहक 1 कोटी 33 लाख 77 हजार 554 होती. डिसेंबर 2017 मध्ये घरगुती ग्राहकांची संख्या 1 कोटी 87 लाख 92 हजार 211, वाणिज्यिक ग्राहक 18 लाख 40 हजार 69, औद्योगिक ग्राहक ३ लाख 87 हजार 9607, कृषी ग्राहक 41 लाख 34 हजार 229 तर इतर ग्राहक 2 लाख 62 हजार 718 मिळून एकूण 2 कोटी 54 लाख 17 हजार 134 इतकी ग्राहकांची संख्या झाली आहे.
तेरा वर्षात राज्यतील महावितरणच्या ग्राहक संख्येत झालेली वाढ